Actually i need all of these, so pls ans as fast as you can, but plssss.
Answers
Answer:
पत्र
उत्तर १ :-
दिनांक 10 फेब्रुवारी 2021.
कावेरी पुस्तकालय,
राणे चौक,
शनिवार पेठ,
गाळा नंबर 4,
पुणे 30.
विषय: ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणे बाबत.
महोदय,
मी दा.म.शास्त्री, म्हात्रे विद्यालय सातारा. शाळेचा ग्रंथालय प्रतिनिधी(ग्रंथपाल) मी आपणास शाळेच्या वतीने पुस्तकांची मागणी करणे बाबत पत्र पाठवत आहे. आजच्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपल्या पुस्तकालयाची जाहिरात वाचली. आपली शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली खास सवलत प्रशंसनीय आहे. जाहिरातीमध्ये शिवजयंतीनिमित्त देण्यात आलेली पुस्तक खरेदी वरची खास सवलत पाहून आम्ही आपल्या पुस्तकालयातून काही पुस्तके खरेदी करू इच्छित आहोत. पत्रासोबत काही निवडक पुस्तकांची यादी पाठवत आहे. आशा आहे कि ही सर्व पुस्तके आपल्याकडे उपलब्ध असतील.
कळावे
आपला नम्र
दा. म. शास्त्री (ग्रंथपाल), म्हात्रे विद्यालय, सातारा 415508.
उत्तर २ :-
२०१ , राम निवास
अलिबाग
प्रियमित्र मोहन यास
तुझ्या बाबांची बदली मुंबई येथे झाल्यामुळे गेली चार वर्षे आपली भेट झाली नाही आणि आपल्या बाळ मैत्रीत अंतर पडलं आहे .तरी तुला प्रत्यक्ष भेटणायची ओढ लागली आहे . तू अलिबाग ला येऊन सुद्धा मला भेटला नाहीस. म्हणूनच तुला मुद्दाम पत्र लिहीत आहे , तुला आता सुट्टी पडणार आहे तर तू मला भेटायला अलिबाग ला ये .आपण सर्व मित्र मिळून सुट्ट्या एकत्र मजेत घालवू या .माझ्या घरचे देखील तुला भेटायला उत्सुकतेत आहेत .
म्हणून मी तुला आता खास आमंत्रण देत आहे की दिवाळीत जरी नाही जमले तरी ते नाताळच्या सुट्टीत नक्की ये.आम्ही तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. पत्रोत्तर लगेच पाठव.
तुझा मित्र
निबंध
उत्तर १ :-
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विज्ञान ही ज्ञानाची सुसंबद्ध, क्रमबद्ध व वैशिष्टपूर्ण शाखा आहे. विज्ञानाने मनुष्य जीवनासाठी उपयुक्त प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आपण ज्या वस्तूंचा उपयोग करतो, ज्या सुविधांचा उपभोग घेतो ती सर्व विज्ञानाचीच देणगी आहे.
उत्तर २ :-
शास्त्रीजींनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान 1965 च्या युद्धादरम्यान हा नारा दिला होता. जेव्हा ते तत्कालीन पंतप्रधान होते. या घोषणेला देशाचे राष्ट्रीय घोषण असेही म्हटले जाते. या घोषणेचे शब्द बघा, मग तुम्हाला कळेल की हा नारा कोणत्या अर्थाने दिला गेला आहे.
ही घोषणा सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांची आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची अतूट मेहनत आणि मेहनत दाखवते. जय जवान जय किसानचा हा नारा लाल बहादूर शास्त्री यांनी रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या एका सार्वजनिक रॅली दरम्यान दिला होता
Explanation:
Please mark me as Brainiliest