English, asked by sajidgujar894, 2 months ago

advantages of playing games in Marathi​

Answers

Answered by Anonymous
4

Explanation:

खेळाचे फायदे :

➪ विविध खेळ खेळणे हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. खेळ खेळल्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. तसेच आपण मजबूत , तंदुरुस्त बनतो. याच बरोबर खेळ खेळल्यामुळे आपल्याला सांघिक नेतृत्व कसे करावे हे समजते. खेळामुळे आपले मनोरंजन होते. खेळाचे असे अनेक फायदे आहेत.

Answered by riya169812
1
दररोज लहान मुल कोणता ना कोणता खेळ खेळतात त्यातुन त्यांची शारिरीक ऊर्जा खर्च होते त्यामुळे त्यांना अधिक उर्जेची गरज पडते परिणामी त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते. खेळांमुळे सहकार्य भावना वाढते मुल आणखी चांगली सामाजिक होतात, एकमेकांसोबत आपले सामंजस्य स्थापीत करतात. खेळांमुळे निर्णय क्षमता विकसीत होते.



बुध्दीच्या सर्व कोशिकामध्ये उर्जा संचारली जाते. खेळांमुळे वर्चस्व व प्रभुत्व मिळविण्याची स्पर्धा लागते, प्रत्येक बाळ आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. मुलं स्वयंकेंद्रीत बनतात. ते आपले विश्व बनवतात ज्यामध्ये ते जगतात.

मुलांमध्ये स्पर्धात्मक गुणांचा विकास होतो.
आत्मियभाव निर्माण होण्यास मदत होते.
स्वभावात उत्साह वाढून उर्जावान वाटते.
शरीरात स्फूर्ती येते.
पालकांवर अवलंबून राहण्याची सवय कमी होते.
मुलांसाठी बाहेर खेळण्याचे उपाय.
मुलांना उत्साहीत करणे.
मुलांमध्ये सहकार्य भावना, नेतृत्व क्षमता आणि सामंज्यस्यता आणि स्पर्धात्मक प्रेरणा वाढविणे फार जरूरी आहे. त्यामूळे हे कौशल्य आत्मसात करता येते.
कौशल्यांना निखारणे.
आपल्या मुलात क्रिडा गुणांचा विकास करणे, त्यांचे शरीर व स्वास्थ्य उत्तम ठेवणे, अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे त्यासाठी उत्साह निर्मीती करणे.
Similar questions