Political Science, asked by shivanikhatade, 7 months ago

advantages of social media in marathi​

Answers

Answered by riya6510
5

 Easier Communication. Customers can contact a customer service representative faster and easier now than ever before thanks to social media.

Networking & Partnerships. ...

Boost Organic Visibility

Answered by kiranshaily1
1

Answer:

तरुणाई रोजचे काही तास लोकप्रिय सोशल साइट्सवर घालवतात. या साइट्स म्हणजे केवळ गप्पा मारण्याचं किंवा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारं/परिणाम करणारं माध्यम बनलं आहे, अगदी आपल्या करिअरवरही. तो कसा, ते आज समजून घेऊ.

तरुणाई रोजचे काही तास लोकप्रिय सोशल साइट्सवर घालवतात. या साइट्स म्हणजे केवळ गप्पा मारण्याचं किंवा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारं/परिणाम करणारं माध्यम बनलं आहे, अगदी आपल्या करिअरवरही. तो कसा, ते आज समजून घेऊ.

ट्विटर, फेसबुक, मायस्पेस यासारख्या ऑनलाइन सोशल नेटवर्किंग साइट्सचा आजच्या तरुणांवर मोठा प्रभाव पडत असल्याचं एका संशोधनातून दिसून आलं आहे. तरुण-तरुणींबरोबरच पौगंडावस्थेतील मुलांच्या आयुष्यावरही सोशल नेटवर्किंग साइट्सचा बराच परिणाम झालेला दिसून येतो. सोशल साइट्सवर वेळ घालवण्याचा सकारात्मक परिणाम आपल्या करिअरच्या बाबतीत निर्णय घेताना कसा होऊ शकतो ते समजून घ्या.

ज्ञानाची/माहितीची देवाणघेवाण : तरुणांबरोबरच इतर युजर्सनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टींची माहिती मिळत असते. आपल्या सभोवताली काय सुरू आहे, याची अपडेटेड माहिती पौगंडावस्थेतील मुलांना या साइट्सच्या माध्यमातून मिळत असते. कित्येक मैल लांब असूनही एकमेकांच्या संपर्कात राहणे आणि एकमेकांशी संवाद साधणेही यामुळे शक्य होते. वेगवेगळ्या विषयांचे विश्लेषण आणि ‘ट्रेडिंग’मध्ये (चर्चेत) राहणे यामुळे शक्य होते. या सगळ्याचा परिणाम अर्थातच, करिअरच्या बाबतीत निर्णय घेताना होत असतो. अशा प्रकारच्या संवाद साधण्यामुळे विविध ठिकाणं, तिथली शिक्षण पद्धती, कामाच्या आणि शिक्षणाच्या संधी, संस्कृती आदी बाबींची माहिती मिळवणं शक्य होतं.

नकारात्मक गोष्टीही लक्षात ठेवा

लहान वयातच हे माध्यम हाती आल्यामुळे नको तेवढा वापर केला जातो. याचे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

सायबर चोरीसारखे गुन्हेगार तयार होण्यासाठी हे एक माध्यम/कारण ठरू शकते.

हॅकिंगसारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे पैसे मिळवण्याचे अनेक गैरमार्ग मुलांना समजू लागले आहेत, जे योग्य नाही.

अभ्यास करताना सोशल मीडिया साइट्स चेक करत राहण्यामुळे एकाग्रता भंग पावते. परिणामी, अभ्यासातील लक्ष कमी कमी होत जाताना दिसते.

दुसऱ्यांच्या ग्लॅमरस पोस्ट आणि फोटोज पाहून आपल्यालाही ते सुख मिळायला हवं, असं त्यांना वाटू लागतं. मात्र यासाठी कोणत्याही प्रकारची मेहनत करण्याची त्यांची तयारी नसते. कोणतीही गोष्ट चटकन आणि सहजासहजी घडावी असं अनेकांना वाटू लागतं.

सोशल मीडियावर मिळणारी ठराविक प्रकारची उत्तरं, कोणताही विषय समजून घेण्याची जाणीव नसणे यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे तितक्याशा गांभीर्याने पाहत नाहीत. सोपे आणि कमी कालावधी असणारे अभ्यासक्रम निवडून करिअर करण्याचा शॉर्टकट हे विद्यार्थी निवडतात.

आवश्यक उपस्थिती : सोशल मीडियाची तुम्हाला असणारी माहिती तुमच्यासाठी अनेक नव्या संधींची दालने खुली करू शकतात. कालपर्यंत करिअरच्या ज्या संधी उपलब्ध नव्हत्या, त्या संधी आज निर्माण होत आहेत. हा केवळ एक योगायोग नाही, तर ते एक वास्तव आहे. उदाहरणच द्यायचं झालं, तर आपला जुना सहकारी किंवा मार्गदर्शक जो सध्या तुम्ही नोकरी मिळवू पाहत आहात, अशा कंपनीत काम करत आहे, तर त्याला शोधून त्याच्यामार्फत या कंपनीत प्रवेश करू शकता.

कमाई/उत्पन्न : सोशल मीडिया साइट्सचा फायदा विविध प्रकारचा व्यवसाय करण्यासाठी/वाढवण्यासाठी करता येऊ शकतो. या साइट्सच्या मार्फत जनसंपर्क वाढवून अधिकाधिक व्यावसायिक संधी मिळवणे यामुळे शक्य होऊ शकते. अभ्यास करता करता असा व्यवसाय वाढवण्याचा असा एखादा प्रकल्प हाती घेऊन स्वत:साठी पैसे (पाॅकेटमनी) मिळवणं शक्य होऊ शकतं. एवढेच नाही, तर आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर या मुलांना

Similar questions