Advertisement of soap in marathi
Answers
Answered by
15
‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ या मोती साबणाच्या मोहक जाहिरातीने गेला महिनाभर मला भुरळ घातली आहे. तसं पाहायला गेलं तर ही एक अगदी सिधीसाधी, थेट जाहिरात आहे. उगीचच कुणी गौरांगना नाही की ओलेते स्नानदृश्य नाही. एक भावुक वृद्ध, एक प्रेमळ पिता अन् एक अवखळ, निष्पाप मुलगा. चाळीच्या गॅलरीत टांगलेले कंदील.. आणि एकापाठोपाठ एक प्रकाशमान होणाऱ्या खोल्या. दरवाजावरची टकटक आणि त्या छोटय़ाने हातात पकडलेला मोती साबण. ही जाहिरात मला माझ्या बालपणात घेऊन गेली. खूप काही आठवले. दिवाळीची सुट्टी. सुट्टीतला गृहपाठ. (प्रोजेक्ट वर्क नव्हे!) पुण्याच्या अप्पा बळवंत चौकात लागलेले दिवाळी अंकांचे स्टॉल्स. अंक सायकलच्या कॅरिअरला लावून आईबरोबर निघालेली अस्मादिकांची वरात. मनपाच्या मोकळ्या जागेत लागलेले फटाक्यांचे स्टॉल्स. आईने जेवढी ‘अमाऊंट’ आखून दिलीये तेवढय़ाच अकरा रुपयांचे फटाके घेणारे आम्ही.. आणि निवडलेल्या फटाक्यांची किंमत पाच-दहा रुपयांनी जास्त झाल्यावर गुपचूप मागे जाऊन फटाकेवाल्याला ते सगळे फटाके पिशवीत भरण्याची खूण करणारे माझे पपा.. घरी आल्यावर त्या फटाक्यांचे चार दिवसांसाठी केलेले वाटे. प्रत्येक वाटय़ाचे पुन्हा सकाळ-संध्याकाळसाठी केलेले वर्गीकरण. घराच्या दारात चिकटवलेली लक्ष्मीची पावले. एक गोलाकार रांगोळीचा स्टिकर. धनत्रयोदशीला पपांच्या हातातील अंगठी मागून घेऊन त्याची केलेली साग्रसंगीत पूजा. अंगणात बांधलेल्या विटा-पोतेरे-मातीच्या किल्ल्यावर पेरलेल्या हिरव्या अळीवाची मखमल. किल्ल्याच्या सर्वात वरच्या माथ्यावर विराजमान झालेले महाराज.. आजूबाजूला पेरलेले मावळे.. हिरकणी बुरुजापाशी उभी असलेली हिरकणी.. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या शेवल्रे, फियाट अशा मोटारींची मॉडेल्स.. ‘महाराजांच्या काळात मोटार कशी?’ असले ऐतिहासिक प्रश्न आम्हाला पडायचे नाहीत. आमच्या करमणूक भंडारातील यच्चयावत गोष्टींना किल्ल्याच्या आजूबाजूला प्रदर्शनीय स्थान मिळायचे.
..नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडायचा तो चिरोटय़ाचा राक्षस.. दूध, तेल आदी उपचारांनी समृद्ध झालेले सुगंधी उटणे.. आणि सर्वावर मुकुटमणी म्हणजे गोल, वजनदार, नदीकिनाऱ्याच्या गोटय़ाप्रमाणे भासणारा गुळगुळीत, प्लॅस्टिकच्या वेष्टणातील मोती साबण. वर्षभर आमचे अंग घासणे लाल लाइफबॉयवर चाले. पण वाणसामानात ऑक्टोबर महिन्यात मोती साबण दिसला की आम्हाला दिवाळी जवळ आल्याची कुणकुण लागे. पाऊस येण्याआधी ‘पेरते व्हा’ सांगणाऱ्या ‘पेर्त्यां’ पक्ष्यासारखा ‘मोती’ आम्हाला आगामी दिवाळीची सूचना देई. त्याचे प्लॅस्टिक कव्हर नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावरच निघे. पण त्यापूर्वी कमीत कमी आठवडाभर तरी मी तो गोल सुगंधी गोटा गालाला घासून पाही. मोती साबणाच्या प्लॅस्टिक आवरणालाही अभ्यासाच्या पुस्तकाच्या एखाद्या प्रकरणाचे मानाचे पान लाभत असे. ‘‘मोती पुरवून वापर.. झिजवायचा नाही..’’ ही आईची दटावणीही नित्याचीच होती. मोतीने आमची दिवाळी अन् आमचे बालपण खऱ्या अर्थाने सुगंधित केले. त्याचा दरवळ आज पाच दशकांनीही जशाच्या तसा शाबूत आहे. म्हणूनच साबणाची जातकुळी बदलली.. रंग, रूप, गंध बदलले. वडीच्या जागी द्रावण आले. फुलांच्या पाकळ्या आल्या. बदामाचे तुकडे आले. सोन्याची िरग साबणात दडल्याची आमिषे आली. परदेशस्थ साबणांचे पीक आले.. त्यातही फेसाळ आणि बुडबुडय़ांचे मिश्रण आले. आमच्या बालपणी न्हाणीघर बाहेरच्या कोनाडय़ात असे. त्या न्हाणीघराची बाथरूम झाली. तिचा आकार घरातल्या खोलीएवढा मोठा झाला. टब आला. शॉवर आले. जाकुझीची मिजास आली. मिक्सर ही बाब फक्त स्वयंपाकघरात वापरायची गोष्ट न उरता आंघोळीच्या पाण्याचे तापमान ठरवू लागली. बाथरूममध्ये टेलिव्हिजन आणि टेलिफोन लागले. आणि-
‘‘कह दो के आ रहे है।
साहब नहा रहें हैं॥’’
हा परवलीचा वाक्प्रचार रूढ झाला. आमची राहणी बदलली, तशी आमची न्हाणीही बदलली. बदलला नाही तो मोती.. त्याचे दिवाळीतील स्थान.. आणि त्याची परंपरा!

iramsayyed2004:
Tu kaha rehta h?
Answered by
24
नमस्कार मित्रा,
■ साबणाची जाहिरात -
सुगंध असा मी सगळे जवळ येतील
★ संतूर साबण ★
सौंदर्य उजळून निघते
तारुण्याचा आस्वाद
त्वचेची काळजी घेते
अतुलनीय चमक
दलवळणारी स्वछता
नवनवीन रंग
विविध प्रकारांमध्ये उपलब्ध
जगभर प्रसिद्ध
रिटेल मध्ये भेटेल
I.S.O. प्रमाणपत्र प्रमाणित
२४ तासांपर्यंत परिणाम
किंमत काय विचारताय, फक्त 10 रुपये.
नोट - सगळ्या आसपासच्या दुकानांमध्ये उपलब्ध
धन्यवाद...

Similar questions