अफजलखानाच्या भेटीच्या वेळी शिवरायांचे वकील कोण होते?
Answers
उत्तर :-
अफजल खान (मृत्यू 20 नोव्हेंबर 1659) हा भारतातील विजापूर सल्तनतच्या आदिल शाही घराण्यात सेवा करणारा सेनापती होता. माजी विजयनगर प्रदेश ताब्यात घेतलेल्या नायक सरांना वश करून विजापूर सल्तनतच्या दक्षिणेकडील विस्तारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
Answer:
ज्यावेळेस अफजलखान विजापूरच्या बेगम चा आदेश घेऊन शिवाजी राजांना कैद करण्यासाठी प्रतापगडाकडे रवाना झाला होता त्यावेळेस त्याने मराठा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शिवाजीराजे त्यावेळेस प्रतापगडावर होते. शिवाजीराजांना शरण आणण्यासाठी अफजल खान ने लोकांना खूप त्रास दिला तसेच देवळे नष्ट केली. हा सर्वात त्रास बघून तरी शिवाजीराजे शरण येतील असे त्याला वाटले.
शेवटी शिवाजीराजांनी आपले वकील गोपीनाथपंत बोकील यांना अफजलखान कडे पाठवले. गोपीनाथपंत बोकील या वकिलाने अफजलखान व शिवाजी राजे यांची भेट प्रतापगडाच्या पायथ्याशी ठरवली.
ठरलेल्या दिवसाप्रमाणे शिवाजी राजे अफजल खानाचा भेटीस आले. शिवाजी राजांना माहीत होते की अफजलखान दगा करेल म्हणून त्यांनीही सावध पवित्रा घेतला होता. अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी राजांनी वाघ नखांच्या त्याच्यावर हल्ला केला व त्याच्या कोथळा बाहेर काढला.