अग्निजन्य खडक कसे तयार होतात?
Answers
Explanation:
पृथ्वीतील तप्त, वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अग्निज खडक’ म्हणतात. ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला ⇨शिलारस म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठाखाली, खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात. शिलारस असलेल्या स्थानापासून निघून कवचाच्या अधिक उथळ भागात जाणाऱ्या भेगा-पोकळ्या नैसर्गिक घडामोडींमुळे उत्पन्न झाल्या म्हणजे त्याच्या वाटे खोल व अधिक दाब असलेल्या जागेतील शिलारस अधिक उथळ व कमी दाब असलेल्या जागी येतात. ते पृष्ठाशी येऊ शकले म्हणजे ⇨ज्वालामुखी निर्माण होतात. जागृत ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला ‘लाव्हा’ म्हणतात. लाव्हे हे शिलारसाचे आपणास प्रत्यक्ष पाहवयास मिळणारे नमुने होत. लाव्हा थिजून तयार होणाऱ्या खडकास ज्वालामुखी खडक, उद्गीर्ण खडक किंवा लाव्हे असेही म्हणतात.
ज्वालामुखीच्या उद्गिरणात शिलारसाचा काही भागच बाहेर लोटला जातो. उरलेला भाग ज्या पोकळीच्या वाटे शिलारस बाहेर पडला त्या पोकळीत शिल्लक राहतो. कालांतराने तो निवून त्याचाही खडक बनतो. शिलारसातून निघून उथळ भागात येणाऱ्या पण पृष्ठाशी येऊन न पोचणाऱ्या अशा पोकळ्याही असणे शक्य असते व त्यांच्यात शिरलेला शिलारस निवून त्याचेही खडक बनतात. पृथ्वीच्या कवचातल्या भेगा पोकळ्यांत शिलारस थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अंतर्वेशी खडक’ म्हणतात. ज्वालामुखी व अंतर्वेशी हे अग्निज खडकांचे मुख्य गट होत.
ans= पृथ्वीतील तप्त, वितळलेला द्रव थिजून तयार झालेल्या खडकांस ‘अग्निज खडक’ म्हणतात. ज्याच्यापासून अग्निज खडक तयार होतात त्या तप्त द्रवाला ⇨शिलारस म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठाखाली, खोल किंवा उथळ अशा ठिकाणी शिलारस तयार होतात. शिलारस असलेल्या स्थानापासून निघून कवचाच्या अधिक उथळ भागात जाणाऱ्या भेगा-पोकळ्या नैसर्गिक घडामोडींमुळे उत्पन्न झाल्या म्हणजे त्याच्या वाटे खोल व अधिक दाब असलेल्या जागेतील शिलारस अधिक उथळ व कमी दाब असलेल्या जागी येतात. ते पृष्ठाशी येऊ शकले म्हणजे ⇨ज्वालामुखी निर्माण होतात. जागृत ज्वालामुखींतून बाहेर पडणाऱ्या शिलारसाला ‘लाव्हा’ म्हणतात. लाव्हे हे शिलारसाचे आपणास प्रत्यक्ष पाहवयास मिळणारे नमुने होत. लाव्हा थिजून तयार होणाऱ्या खडकास ज्वालामुखी खडक, उद्गीर्ण खडक किंवा लाव्हे असेही म्हणतात.