अग
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) जैन धर्मात........या तत्त्वाला महत्त्व दिलेले
आहे.
(२) सर्व प्राणिमात्रांविषयीची.........हे गौतम
बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य
होते.
थोडक्यात उत्तरे दया
Answers
Answer:
(१) अहिंसा
(२) करूणा
Explanation:
(१) जैन धर्मात अहिंसा या तत्त्वाला महत्त्व दिलेले
आहे.
(२) सर्व प्राणिमात्रांविषयीची करूणा हे गौतम
बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य
होते.
अतिरिक्त माहिती :
जैन धर्म :
भारतामधील प्राचीन धर्म यापैकी एक धर्म म्हणून जैन धर्म ओळखला जातो. जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर प्रसिद्ध आहेत.
जैन 'जिन' या शब्दापासून बनलेला आहे.
'जिन' म्हणजे सर्व विकारांवर विजय मिळविणारे.
★ जैन धर्माची पंचमहाव्रते:
१) अहिंसा, २) सत्य, ३) अस्तेय, ४) अपरिग्रह , ५) ब्रह्मचर्य
बौद्ध धर्म :
बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध आहेत.
★ पंचशील :
१) प्राण्यांची हत्या करू नये,
२) चोरी करू नये,
३) असत्य बोलू नये,
४) अनैतिक आचरण करू नये,
५) मादक पदार्थाचे सेवन करू नये.
Answer:
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) जैन धर्मातया अहिंसा तत्त्वाला महत्त्व दिलेले
आहे.
(२) सर्व प्राणिमात्रांविषयीची करूणा हे गौतम
बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्य
होते.
and give me Bannister answers please