अग्रलेख आणि बातमी यांतील फरक स्पष्ट करा.
Answers
खूप दिवस अथवा महिन्यांपासून कुठल्या विषयाला न्याय मिळाला नसेल अथवा चर्चा होत असेल तर त्या विषयावर संपादक पेपर मधे आपले अग्रलेख लिहितात.
बातमी लेखन हे अग्रलेख पेक्षा थोडे वेगळे असते.
जी गोष्ट घडली असते त्यावर बातमी लिहिण्यात येते.
खाली बातमी चे उदाहरण दिले आहे:
"आनंदराव पवार विद्यालयात, भाषण स्पर्धा संपन्न"
दिनांक: २३ जुलै २०१९, शनिवार:
अंधेरीतील, आनंदराव पवार विद्यालयात दिनांक २२ जुलै रोजी अंतर शालेय भाषण स्पर्धा संपन्न झाली. शाळेच्या सभागृहात मुलांची भव्य गर्दी दिसून आली. ४ शाळेतून, सुमारे २५ मुले स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती. मुलांना विषय आधीच दिले होते, त्यांना त्या विषयावर ५ मिनटे बोलायचे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय लेखक श्री आदेश कुलकर्णी ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
माझे वडील, माझे प्रेरणास्थान, आठवणीतले आजोबा ह्या सारख्या विषयांवर भाषण ऐकण्यात आली.
मुलांच्या उच्चारावर, मजकूर वर लक्ष देऊन त्यांना गुण देण्यात आले. आनंदराव पवार मधील, कुमार रमेश कदम ह्याने पहिले बक्षीस पटकावले.
कार्यक्रमाची सांगता, मान्यवरांच्या भाषणाने झाली.
एकूण ही स्पर्धा मुलांमध्ये आनंद घेऊन आली.