Agnishaman dalachya javanachi mulakhat genasathi question
Answers
Answer:
Yaha he
Explanation:
कोणत्याही देशात संरक्षणाची चौथी फळी “अग्निशमन सेवा” असे मानण्यात येते. इतर तीन म्हणजे संरक्षण दलाची तीन दले आहेत. अग्निशमन सेवेचे महत्व फक्त युध्दाच्या वेळेसच नव्हे तर नेहमीच्या शांततेच्या वेळी सुध्दा सिध्द झालेले आहे आणि ते वाढते नागरी वस्तीचे क्षेत्र, कारखान्याचा विकास आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ते वाढत असते.
अग्निशमन सेवेचे कर्तव्य, फक्त आगीपासुन जीवन आणि मालमत्ता वाचविणे आणि त्यापासूनचा दुष्परिणाम कमीत कमी करणे एवढेच नसुन बंद गटारे, विहीरी, उदवहन यंत्रे किंवा इतर यंत्रसामुग्री यात अडकून पडलेल्यांची आणि इतर (प्राणी मात्र यांची सुरक्षा), अडकलेल्यांची सुटका करणे हेही आहे. थोडक्यात, अडचणींच्या किंवा सत्व परिक्षा पाहणा-या प्रसंगात अग्निशमन सेवा, कर्मचा-यांचे धैर्य आणि खास सामुग्री हाताळण्याचे खास प्रशिक्षण यामुळे लोकांना सहाय्य करण्याकरिता उपयोगी पडते.
अग्निशमन सेवेचे कार्य सामान्यपणे, आगीपासून संरक्षण करणे, आगीचा प्रतिबंध करणे व सेवेचा परिणामकारकरित्या वापर करुन जिवित व वित्त हानी टाळणे हे असल्याने सर्व पातळीवर स्थिर, प्रबल, परिणामकारक आणि आदर्श संघटन असणे गरजेचे आहे.
अग्निशमन सेवेचे कार्यच अत्यावश्यक सेवेच्या स्वरुपाचे असल्याने अशा निकडीच्या प्रसंगीच्या सर्व हालचाली विभिन्न नियंत्रणाद्वारे पध्दतशीरपणे चालविण्याकरिता या संघटनेला उपयोगी पडणारे प्रभावी मदतीचे साधन म्हणजे संघटनेचे स्थायी आदेश. या नियमपुस्तिकेत अग्निशमन दलाच्या प्रत्येक व्यक्तीने त्या त्या प्रसंगात कोणती कार्यपध्दती अनुसरावी या बाबतीत स्पष्ट कल्पना येण्याकरिता एक प्रमाणभुत कार्यपध्दती विहीत करण्याचा प्रयत्न केला आहे.