अहिल्याबाई कोणाचा पत्नी hotay
Answers
Answer:
सोमवार दि ३१ मे २०२१ रोजीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती बाबत थोडसं…
राजकर्त्या, राष्ट्रमाता, राजमाता विश्वमाता, पुण्य श्लोकअहिल्या देवी होळकरांबाबत बरच काही….
अखंड भूमीचे सर्वात पहिले राजे चंद्रगुप्त मौर्य या हिंदुस्थानच्या मातीमधले सर्वात बलाढ्य सम्राट, हे सम्राट अशोक.
आणि पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावर्ती स्वराज्याचं स्वातंत्र्याचं पाहिलं पुष्पार्तिक करणारे जगाच्या इतिहासातले आपले सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज.
आणि भरल्या शिवारातील कणसे कापावीत तसा युग यवनजयनी सैन्य कापून काढले आणि मराठी साम्राज्याचा झेंडा अटकेपार रोवला ते आपले श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर.
तसेच जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारे आपले राजे महाराजे तुकोजीराव होळकर.
इंग्रजांना याच हिंदुस्थानच्या मातीमध्ये आपल्या तलवारीने पाणी पाजून कित्येक वेळा पराभूत करणारे आणि स्वतः एकदाही पराभूत न होणारे अजिंक्य योद्धे आपले छत्रपती यशवंतराव होळकर.
प्रस्थापितानी ज्या समाजाला जिवंतपणी मृत ठरवलं त्याच समाजातून पुढे येऊन परकीयांच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारणारे आपले क्रांतिवीर उमाजी नाईक.
ज्यांनी या देशाला संविधान दिल नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिल ते आपले भारतरत्न विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज्ञानांना अंधारलेल्या समाज्यामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली ते आपले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविध्य पत्नी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागानं जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या सर्वाधिक २९ वर्ष आदर्श राज्य कारभार करणाऱ्या महिला राज्यकर्त्या आपल्या राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अखंड हिंदुस्थानचा राजबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मानाचा मुजरा* .
खरतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही तर तो इतिहास जमा होतो.
अहिल्यादेवीचा लोककल्याणकारी इतिहास, इतिहास जमा करण्याचं षडयंत्र याच मातीमध्ये घडत आलं आणि अहिल्यादेवींच्या हाती पिंड देऊन त्यांना निव्वळ धार्मिकतेच्या चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकले. अरे हिमालयापेक्षा ही शौर्य होत अहिल्यादेवींचं.
हळू हळू त्याला सह्याद्री एवढं करत करत आता एखाद्या टेकडी एवढं करून सारा इतिहास गायब झाला तो आमच्या डोळ्यासमोर मित्रानो गौतम ऋषींच्या पत्नी असणाऱ्या अहिल्या आमच्या घरात घरात पोहचल्या या विश्वाच्या पाठीवरती तब्बल २९ वर्ष राज्य करणाऱ्या राज्यकर्त्या, राष्ट्रमाता, राजमाता विश्वमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अजून आम्हाला समजलेल्या दिसून येत नाही ही आमची शोकांतिका आहे माऊली.
पुराणातल्या अहिलेला शाप दिला आणि तिचा दगड झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पायाच्या स्पर्शाने तिच्या आयुष्याचा उद्धार झाला. तसे अहिल्यादेवींच्या पदस्पर्शाने रामासहित सगळ्या देवांचा कार्याचा उद्धार झाला हे मात्र आम्हाला विसरून चालणार नाही.
Answer:
खंडेराव
अहिल्याबाई या मराठा साम्राज्याच्या प्रसिद्ध राणी खंडेरावांच्या पत्नी आणि इतिहासप्रसिद्ध सुभेदार मल्हारराव होळकर यांची पुत्र होती.