ऐका. म्हणा. वाचा. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे... व
Answers
Explanation:
प्रिय आम्हाला येथील माती प्रिय हे पाणी झुळझुळते, प्रियकर ही डुलणारी शेते प्रिय हे वारे सळसळते ।।१।। प्रियतम आमुचा धवल हिमालय बघे भिडाया जो गगना, प्रियतम अमुचे सह्यविंध्य हे प्रियतम या गंगा जमुना ।।२।।
मानव सारे समान असती शिकवण ही जगतास दिली, या मातेची मुले सद्गुणी सर्व जगाला प्रिय झाली ।।३।। प्रियतम अमुची भारतमाता वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू ।।४।। - शांता शेळके
Answer:
ऐका. म्हणा. वाचा.
हवेवरी त्या होत स्वार मी
अवकाशी विहरावे,
मनात माझ्या नेहमी येते
मी पक्षी व्हावे..
दवबिंदू होऊनी पहाटे
गवतावर उतरावे,
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी
पुन्हा पुन्हा परतावे...
क्षितिजावरचे गडद रंग मी
ढग होऊनी झुलावे,
भरारणारा होऊन बारा
चंद्राशी खेळावे...
धुक्यापरी मी अलगद अलगद
धरणीवर उतरावे,
अवघे जग झाकूनी तयाला
मिष्किलतेने पहावे...
उर्जेचा तो स्रोत सूर्य मी
अगदी जवळून पहावा,
काळोखाला चिरत चिरत मी
सूर्य किरण व्हावा...
निसर्गातल्या रंगामध्ये
मी रंगून जावे,
भास नको मज, तुम्हा सांगतो
हे खरे खरे व्हावे...
सुमती