अजस्र कड. (टिपा लिहा)
Answers
अजस्त्र कडा ब्राझीलमध्ये लहान प्राकृतिक विभाग आहे. अजस्त्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडकले जातात.
त्यामुळे आग्नेय परिसरात खूप जास्त पाऊस पडतो. एका भागात ब्राझिलची उच्चाभुमीची उंची सरळ एका उतारत संपते, ह्या कारणामुळे कड्यासारख्या भागाचे उगम होतो. ह्या कड्याची उंची ७९० मीटर एवढी आहे. काही भागात ही उंची टप्या टप्याने कमी होताना दिसते.
Answer:
अजस्र कडा हा ब्राझीलच्या प्रमुख पाच प्राकृतिक विभागांपैकी एक आहे.
Explanation:
अजस्र कड्यामुळे ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू सीमांकित होते.
१) उताराचे स्वरूप व अजस्र कड्याची उंची:
१. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील बाजूस ( सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात ) सरळ उतारा मुळे उच्चभूमीची उंची संपते व अजस्र कड्याची निर्मिती ( सुरुवात ) होते.
२. हा सुमारे ७९० मीटर उंचीचा कडा आहे.
२) अजस्र कडा व हवामान यांचा संबंध:
१. या कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात.
२. अजस्र कड्याच्या पलीकडे पर्जन्यछायेचा प्रदेश ( कमी पावसाचा प्रदेश ) निर्माण होतो.
३. या कड्याच्या पलीकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाची 'अवर्षण चतुष्कोन' अशी ओळख आहे. अवर्षण म्हणजे जिथे कधीही पाऊस पडत नाही. असा चौकोनी प्रदेश तेथे निर्माण झाला आहे.
अधिक माहिती:
ब्राझीलमधील प्राकृतिक विभाग:
१. उच्चभूमी ( ढालक्षेत्र / गियाना उच्चभूमी )
२. अजस्र कडा
३. किनारी प्रदेश
४. मैदानी प्रदेश
५. द्वीपसमूह