अकस्मात् पडलेला पाउस निबंध मराठी
Answers
Answer:
मार्च महिन्यात उन्हाची रखरख वाढलेली होती.उकाडा असा की पंखे कुलर ही उष्ण हवा फेकून अधिकच उष्णता वाढवत होते .जरा बाहेर भटकंती करावी.शरीराला थंडावा मिळावा म्हणून बाहेर जावं तर कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती.घरात राहावे तरी किती ? हे नकोसं झालेलं कोंडलेपण उबग आणणारं होतं.
असे कसे तरी चार महिने काढले आणि मुख्यमंत्र्यांनी आजच लाॅकडाऊन काही भागात शिथिल केल्याची घोषणा केली.सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला . मी बाबांना सहज म्हटले
बाबा आपण एक दिवस बाहेर जाऊ या का ? खूप बांधलेल्या सारखं वाटतंय घरात बसून बसून . आणि बाबांनी होकार देताच मी आणि दादाने मोठा कल्ला केला
उद्या फिरायलि जायचं !
आज सर्वांनी जाण्याची तयारी केली.छान कपडे घातले.आणि आमच्या नगर शहरातील मध्यवर्ती असलेल्या वागेत फिरायला आलो .तर ही गर्दी वाटलं आख्ख्ं नगर या लक्ष्मी उद्यानात आले की काय ? पण सारं शहरंच संचारबंदी चर्या तडाख्यात सापडल्यामुळे आज अनलाॅक असा गजबजून जाणारच होता.
मस्तच बागेला हुंदडलो.खेळलो.पाळण्यात बसलो.भेळ पाणी पुरी खाल्ली . बागेतील हिरवळ पाने फुले फळे वेली सारे काही नवेनवे वाटले .वाटलं इथून घरी जाऊच नये.
पण अचानक सोसाट्याचा वारा सुटला.वावटळ उठले.धूळीचे लोळ उठले भरभर ढगांनी वातावरण भरून आले.प्रकाशात काळोख दिसू लागला.ढगांचा कडकडाट होऊन वीजा चमकू लागल्या आणि पाहता पाहता पावसाचे थंडगार टपोरे थेंब टपाटप पडू लागले.वारा वाढला तसा पावसाचा जोरही वाढला.
Explanation: