Accountancy, asked by naseermak7097, 7 months ago

अकस्मात पडलेला पाऊस, त्यामुळे शेतकर्यांच्या आर्थिक जीवनावर झालेला परिणाम तुमच्या शब्दात लिहा.

Answers

Answered by Sauron
7

समाजात दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मनुष्य प्रगतीचा आलेख वरचढ होत आहे. मानवाने कितीही प्रगती केली तरीही काहीं वर मात करता येत नाही, अगदी तसेच निसर्गाच्या बाबतीत म्हणता येईल. निसर्गावर मानव नियंत्रण करू शकत नाही.

निसर्गाच्या या मनमानी धोरणामुळे सदैव नुकसानच झाले आहे असे म्हणता येईल. मुख्यत: यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे. शेतकरी सतत त्याला बळी पडतात मग तो दुष्काळ असो वा गारपीट नुकसान शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे होते.

पिकांची लागवड (पेरणी) केल्यावर पाऊस नाही पडत परिणामतः पिके जळून, वाळून जातात. नंतर जी पिके टिकतात तेव्हा अकस्मात पाऊस पडतो आणि ती पिके खराब होतात. शेतात पाणी साचते, अतिवृष्टी झाल्यास पिके वाहून जातात, काही पिके काढणीला आलेली असतात त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होते हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो. तसेच दुसऱ्या ऋतूतील पिकांच्या लागवडीवर परिणाम होतो.

शेतातील पिके (शेतमाल) (ज्यावर शेतकरी आणि त्याचे कुटुंब आपल्या उदरनिर्वाह करतात) नष्ट झाल्यामुळे बाजारात त्याला योग्य भाव मिळत नाही. पिकांची पेरणी, खत, मजुरी खर्च त्यांची भरपाई करणे पण अशक्य होते. आर्थिक परिस्थिती अशी निर्माण होते की,काढलेलं कर्ज न फेडता अजून कर्ज काढण्याची (घेण्याची) मजबूरी शेतकऱ्यांवर येते.

परिणामतः कर्जाचा बोजा वाढत जातो.

Similar questions