Computer Science, asked by rajendrabodke24, 6 months ago

अल्गोरिदम म्हणजे काय ?​

Answers

Answered by Anonymous
13

Answer:

'अल्गोरिदम' म्हणजे काय?

एखादे हाती घेतलेले काम पायरी पायरी ने सोडवण्यासाठी बनवलेला आराखडा.. स्टेप बाय स्टेप केलेले एखादे काम.

“A step by step execution of program.” जे प्रोग्राम असतात ते पायरी पायरी मिळून पुर्ण केलेले असतात.

उदाहरणार्थ :

चहा बनवायचा algorithm काय असेल?

Input : पाणी, चहा पावडर, दुध आणि साखर.

पायरी १ : स्टोव्हवर लहान भांड्यात थोडं पाणी घेऊन त्याला उकळवा.

पायरी २ : मग आता त्यात दोन चमचे चहा पावडर टाका.

पायरी ३ : पाण्याला काळा तपकिरी रंग आला की थोडं दुध आणि गरजेपुरता साखर टाका.

पायरी ४ : थोडं उकळू दिल्यानंतर भांडे खाली उतरवावे नी स्टोव्ह बंद करावा.

Output : गरमागरम चहा.

हा झाला चहा बनवायचा algorithm. Algorithm हा step by step असतो हा. आपण पायरी ३ दुध टाकायची ती १ वर नाही करु शकतं.. पायरी १.२.३.४ असंच पुढे जायचं असतं.

Algorithm चा फायदा काय होतो?

वरील उदाहरण च पहा. कुठलीही गोष्ट स्टेप बाय स्टेप होते. आम्ही सरळ उठून थोबाडं घेऊन program नाही बनवतं.. अगोदर program चा algorithm बनवतो की सगळ्यांत पहिली पायरी आपली हीं, मग असं होईल, मग दुसरी ही.. हा असेल input आणि हा मिळेल output.

Algorithm मुळे काय करायचे, काय नाही करायचे, कधी करायचे सगळे कळते. आम्ही Program तुकडे तुकडे करून बनवतो नी मग त्यांना एकत्रितपणे जोडतो. त्यात Algorithm अतिशय महत्त्वाचा.

Similar questions