Hindi, asked by diksha7346, 6 months ago

२. अलंकार :
पुढील ओळींमधील उपमेय व उपमान, समान गुणधर्म,

(i) ढगाआडुनी एक चांदणी
जणू परी अवतरली गगनी.​

Answers

Answered by Vanisher
2

Explanation:

Send the complete question

Answered by Anonymous
9

अलंकार

अलंकार म्हणजे दागीणे होय

{{हा लेख|काव्यातील अलंकार|अलंकार(निःसंदिग्ध

कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृहत

मधून

=शब्दालंकार= पाणिदार

यमक

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार

होतो

उदा :

जाणावा तो ज्ञानी

पूर्ण समाधानी

निःसंदेह मनी

सर्वकाळ

पहिला पाऊस पडला

सुगंध सर्वत्र दरवळला

पुष्ययमक

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो

कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.

दामयमक

आला वसंत कविकोकिल हाही आला

आलापितो सुचवितो अरुणोदयाला

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

तल्लिले मधि तल्लीन न हो कल्लोलिनी! कवी कवण तरी?

जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी

श्लेष

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा :

सूर्य उगवला झाडीत...

झाडूवाली रस्ता झाडीत...

शिपाइ गोळ्या झाडीत...

अन् वाघहि तंगड्या झाडीत...

राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण

अर्थश्लेष

वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा :

तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच

सभंग श्लेष

उदा :

श्रीकृष्ण नवरा मी नवरी

शिशुपाल नवरा मी न-वरी

कुस्करू नका ही सुमने

जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने

ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले

औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

अनुप्रास

एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.[१]

उदा० :

गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले

शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले(नि)

लाटानुप्रास

पुढे दिलेले समर्थ रामदासस्वामीकृत 'नृसिंह पंचक स्तोत्र' हे लाटानुप्रासाचे उत्तम उदाहरण आहे. :

नरहरी नरपाळें भक्तपाळें भुपाळें।

प्रगट रुप विशाळें दाविलें लोकपाळें।

खवळत रिपुकाळें काळकाळें कळाळें।

- श्रीसमर्थ रामदासस्वामी

अर्थालंकार

उपमा

उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. पहिल्या वस्तूला उपमेय आणि दुसऱ्या वस्तूला उपमान म्हणतात.

उदा०

सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, येथे सावळा रंग हे उपमेय आणि पावसाळी नभ हे उपमान.

उत्प्रेक्षा

उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.

उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, गमे, वाटे, भासे, की असलाच एखादा शब्द वापरून दोन वस्तूंमधील सारखेपणा दाखविण्याचा प्रयत्‍न असतो.

उदा०

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.

सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.

अत्रीच्या आश्रमी

नेले मज वाटे

माहेरची वाटे

खरेखुरे

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते|

उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते|| (बालकवी)

रूपक

रूपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

उदा :

बाई काय सांगो

स्वामीची ती दृष्टी

अमृताची वृष्टी

मज होय

ऊठ पुरुषोत्तमा

वाट पाहे रमा

दावि मुखचंद्रमा

सकळिकांसी

नयनकमल हे उघडित हलके जागी हो जानकी ।

अपन्हुती

(अपन्हुती म्हणजे लपविणे/झाकणे)

अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो.

उदा :-

न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे.

अन्य उदाहरणे-

हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |

आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी

ती हाक येई कानी मज होय शोक भारी

नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी

अन्योक्ती

अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. दुसऱ्यास उद्देशून केलेली उक्ती. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.

येथे समस्त बहिरे बसतात लोक

का भाषणे मधुर तू करिशी अनेक

हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक

कोकील वर्ण बघुनि म्हणतील काक

देखोनी उदया तुझ्या द्विजकुळे गाती अती हर्षुनी |

शार्दूलादिक दुष्ट सर्व दडती गिर्यंतरी जाउनी |

देशी ताप परि जसा वरिवरि येशी नभी भास्करा |

अत्युच्ची पदि थोरही बिघडतो हा बोल आहे खरा |

पर्यायोक्ती

एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.

त्याचे वडील 'सरकारी पाहुणचार' घेत आहेत. (तुरुंगात आहेत)

विरोधाभास

एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.

जरी आंधळी मी तुला पाहते

सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही

मऊ मेणहूनी आम्ही विष्णुदास कठिण वज्रास भेदू ऐसे

व्यतिरेक

(विशेष स्वरूपाचा अतिरेक)

व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. "जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा 'व्यतिरेक' अलंकार होतो."

उदा ०

अमृताहुनि गोड नाम तुझे देवा

स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे) असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे 'व्यतिरेक' अलंकार झालेला आहे.

अन्य उदाहरणे-

कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान

तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |

पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||

सावळा ग रामचंद्र

रत्नमंचकी झोपतो

त्याला पाहून लाजून

चंद्र आभाळी लोपतो

देवाहुनही महान आहे माझी आई.

I HOPE IT'S HELPFUL FOR YOU. ☺FOLLOW ME. ✌

Similar questions