CBSE BOARD X, asked by sohamnaikwade1, 2 months ago

अलीकडे सुशिक्षित वर्गातच नव्हे, तर विचारवंतांमध्येही विज्ञानविषयक गैरसमजच जास्त आहेत. अनेकांना तंत्रज्ञान म्हणजेच विज्ञान, असे वाटते. वस्तुतः प्राचीन काळातील माणसाने प्रथम पाचही बोटांचा वापर केला, दगडांपासून अणकुचीदार शस्त्रे तयार केली किंवा गारगोटीवर गारगोटी घासून जाळ निर्माण केला, तेव्हाच तंत्रज्ञानाचा जन्म झाला होता. ते तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि आजही होत आहे. परंतु विज्ञानाच्या | तत्त्वज्ञानाचा जन्म हा अगदी अलीकडला आहे. ते पूर्वेकडील राष्ट्रांत जन्माला आले की पाश्चिमात्य, हा वाद बाष्कळ आहे. राष्ट्राच्या सीमा, धर्माची बंधने वा भाषेच्या मर्यादा विज्ञान ओळखत नाही. विज्ञान ही पाश्चिमात्यांची देणगी' नाही वा मक्तेदारी नाही. वैज्ञानिक विचार जगभर होत होते. तसा विचार करणारे सर्वजण प्रयोगशाळेत काम करीत होते, असेही नाही. ते निरीक्षण करीत होते, त्याआधारे काही अंदाज बांधत होते, गणिती तर्क लढवीत होते, एखादे सूत्र आकड्यात वा चिन्हात बसवू पाहत होते, निष्कर्ष काढत होते आणि काय होऊ शकेल, याबद्दल स्थूल असे भाकीत करीत होते. असे ऋषिमुनी जगभर होते.

• कुमार केतकर

'बदलते विश्व', प्रेस्टीज प्रकाशन [पृ. २४३] |

Scanned by TapScanne

(२) आकलन

• उत्तरे लिहा :

(i) अनेकांच्या मनातला गैरसमज सांगा.

Answers

Answered by vaishnavibarad8
8

Answer:

२)आकलन

• उत्तरे लिहा :

(i) अनेकांच्या मनातला गैरसमज सांगा.

Explanation:

अनेकांना तंत्रज्ञान म्हणजेच विज्ञान, असे वाटते. हा अनेकांच्या मनातला गैरसमज आहे.

this is your answer thanks me and mark me as brainlist..

Answered by sanjanasalunke8888
2

Explanation:

सत्य की असत्य ते लिहा धर्माला राष्ट्राची सीमा व भाषा यांची बंधने नसतात

Similar questions