India Languages, asked by yuvraj3399, 11 months ago

Alexander Ne Bharat aur Kelele Aakraman in Marathi​

Answers

Answered by fistshelter
12

Answer:जगाच्या इतिहासात फारच कमी राज्यकर्ते असे होऊन गेलेत की ज्यांच्या नावापुढे 'महान' अशी उपाधी लावली जाते. त्यांपैकी एक म्हणजे अलेक्झांडर दि ग्रेट उर्फ सिकंदर हा होय. तो मॅसिडोनियाचा राज्यकर्ता होता. त्याकाळी ग्रीक संस्कृतीला ज्ञात असलेला संपूर्ण प्रदेश त्याने जिंकून घेतला होता आणि म्हणूनच तो जगज्जेता म्हणूनही ओळखला जातो. जग जिंकण्याच्या लालसेने त्याने इ.स.पू. ३२६ मध्ये भारतावर आक्रमण केले.

सिंधू नदी ओलांडून आपल्या प्रचंड सैन्यासह तो तक्षशिलेवर चालून गेला. तत्कालीन पश्चिमोत्तर प्रदेशातील बहुतांश राज्यकर्त्यांनी त्याच्यासमोर गुडघे टेकले. परंतु पुरु नावाच्या राजाने मात्र असे करण्यास नकार दिला आणि अलेक्झांडर सोबत पूर्ण ताकदीने लढाई केली. जरी पुरु ही लढाई हरला असला तरी त्याच्या असामान्य धैर्याने अलेक्झांडरचे मन जिंकले आणि त्याने पुरुला अभय दिले. या दोघांमधील ही लढाई जगप्रसिद्ध आहे. यानंतर अलेक्झांडरच्या सैन्याने आसपासचे प्रदेश जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या लढायांमुळे त्याचे सैन्य पूर्णपणे थकले होते. सैन्याने अधिक पुढे जाण्यास नकार दिल्याने अलेक्झांडरला माघार घ्यावी लागली. इ.स.पू. ३२३ मध्ये माघारी जाताना वाटेत बाबिलोन येथे मलेरियाची लागण होऊन या जगप्रसिद्ध सम्राटाचा अंत झाला.

Similar questions