अलकांर म्हणजे काय???????????
Answers
अलंकार
अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.
पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, त
र त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.
kavya ki shobha badhane wale shabdo ko alankar kahte hain