अमर, अकबर आणि अँथोनी त्यांच्या स्वत:च्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरे खालील सारणीत दिली आहेत.
1.अमर, अकबर आणि अँथोनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे?
2. ठरावीक कालावधीत सारखेच अंतर कोणी पार केले आहे?
3. अकबरने ठरावीक कालावधीत कापलेले अंतर सारखेच आहे का?
4. अमर, अकबर आणि अँथोनी यांनी ठरावीक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत?
Answers
१.अमर, अकबर आणि अँथोनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी अर्धा तास म्हणजेच ३० मिनिटे इतका आहे तर दोघांनी १२० किलोमीटर चे अंतर ३ तासात म्हणजे १८० मिनिटात पूर्ण केले आहे आणि एकाने ३ तासात ८४ किमीचे अंतर कापले आहे.
२. ठरावीक कालावधीत सारखेच अंतर अमर ने पार केले आहे. त्याने प्रत्येकी ३० मिनिटात २० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. तसेच अँथनीने देखील प्रत्येकी ३० मिनिटात १४ किमीचे समान अंतर पार केले आहे.
३.अकबरने ठरावीक कालावधीत कापलेले अंतर आजिबात समान नाही . त्याने पहिल्या एक तासात ३६ किमी म्हणजे १८ किमीचे दोन टप्पे पार केले, मात्र पुढे त्याचे अंतर समान नाही आहे.
४. संबंधित तक्ताचा विचार केला असता अमर, अकबर आणि अँथोनी यांच्या चाली आणि वेग विविध आहे.अमरची चाल खूप जलद आणि नियमित आहे तो ठराविक वेळेत समान अंतर पार करत आहे. अमरच्या तुलनेत अकबर सावकाश गतीने चालला आहे मात्र त्याची चाल अनियमित परंतु अँथनीच्या तुलनेत जलद आहे. अमर आणि अकबरच्या तुलनेत अँथनी खूप सावकाश चालला आहे . परंतु त्याच्या चलित आपल्याला नियमितता दिसून येते.
★उत्तर- १)अमर, अकबर आणि अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी प्रत्येकी अर्धा तास असा आहे.
२)अमर, अकबर व अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या ठरावीक कालावधीत सारखेच अंतर अमरने पार केले आहे.
३)अमर, अकबर व अँथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या ठरावीक कालावधीत अकबरने कापलेले अंतर सारखेच नाही.
४)अमर, अकबर आणि अँथनी यांनी ठराविक कालावधीत कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चालीला एकसमान गती व नैकसमान गती असे म्हणतात.
जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एकसमान गती असे म्हणतात.
जर वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नैकसमान गती असे म्हणतात.
धन्यवाद...