Hindi, asked by nagesh9449, 11 months ago

ambition in life marathi essay​

Answers

Answered by debismita
2

Answer:

⬆️hope it could helps you:)

thanks!

Attachments:
Answered by vaishnavishirke2609
1

Answer:

डॉक्टर, इंजीनीअर झालो की माझे ध्येय साध्य होईल. पदवी मिळते. पुढे ? भरपूर पगाराची नोकरी मिळाली की माझे ध्येय साध्य होईल. पुढे चांगली बायको, मुलेबाळे, स्वत:चे घर, आणखी पैसा, आणखी सोयी, परदेशगमन... ! अरे, अरे, किती ही ध्येये ? त्यांच्यामागे पळता पळता एक दिवस हे सगळं राहतं इथेच अन पळणारा जातो स्वधामाला...

चांगली पदवी, चांगला व्यवसाय, चांगला/ली जीवनसाथी, मुलेबाळे, उपनगरात एक छोटंसं घरकुल , भरपूर पैसा, विस्तृत मित्रपरिवार इ. इ. यांना जीवनाची ध्येये म्हणावे का?

यापेक्षा अधिक व्यापक ध्येय कोणते ?

सामान्य माणसाच्या जीवनाचे ध्येय काय असावे ?

थोर थोर नेते , राष्ट्रपुरुष यांची कार्ये ही सामान्य माणसांच्या जीवनाचे ध्येय असावे का ? तितकी कुवत आहे की नाही हे नको का पाहायला ?

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ध्येय साध्य करण्यातच आपले हित आहे हे आपल्याला निश्चित माहिती आहे का ?

तसे पाहिले तर ध्येय ठरवताना ते साध्य केल्यानंतर आपण सुखी होऊ अशी आपली खात्री असते. पण ते साध्य होते तेव्हा हे सुख ओंजळीतल्या पाण्यासारखे कधी निसटून जाते हातातून कळतही नाही.

तेव्हा ध्येय ठरवताना सुखाचा विचार होणे आवश्यक असावे. तसेच प्रत्येकाच्या जीवनाचे ध्येय अगर उद्देश्य सारखे असण्याचे मुळीच कारण नाही. निसर्गात हजारो अविष्कार पाहायला मिळतात. पण एक जीव कधी दुसऱ्यासारखा नसतो. एक पान दुसऱ्यासारखे नसते, एक दृश्य कधी दुसऱ्यासारखे नसते. अगदी जुळ्या मुलांचे उदाहरण घेतले तरी त्यांचे बोटांचे ठसे किंवा डोळ्यांचा रेटिना यात फरक असतोच. मग एकाच्या जीवनाचे ध्येय दुसऱ्यासारखे का असावे ?

यशस्वी व्यक्तींच्या मुलाखतीमध्ये एक ठराविक प्रश्न असतो. 'तुमच्या लहानपणी तुम्हाला कोण व्हायचे होते ?' माझ्या माहितीत तरी आजवर या प्रश्नाचे उत्तर एकाही प्रसिद्ध व्यक्तीने 'आज जो मी आहे तोच.' असे दिल्याचे आठवत नाही. गायकाला डॉक्टर व्हायचे होते. अभिनेत्याला चित्रकार व्हायची आकांक्षा होती. उद्योगपतीला आर्किटेक्ट होण्याची इच्छा होती अन बँकरला साहित्यिक व्हायला आवडले असते. पण तरीही या व्यक्ती आपापल्या जीवनात इतक्या यशस्वी झाल्या की त्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या.

तेव्हा ध्येय ठरवताना आपल्या खऱ्याखुऱ्या आवडीनिवडी, कल महत्त्वाचे की आपल्याला काय चांगले जमते अन कशात गती आहे हे महत्त्वाचे ?

तसेच अयशस्वी व्यक्तींच्या कधी मुलाखती जाहीर झाल्या नाहीत. पण त्यापैकी काहींच्या अनुभवावरून असे लक्षात येते की त्यांनी वारंवार व सर्वतोपरी प्रयत्न करूनही काही गोष्टीत त्यांना कधीच यश मिळाले नाही. याउलट काही व्यक्तींच्या बाबतीत असेही घडते की सहज हात पुढे करावा अन हातात फळ पडावे तसे एकाच अन साध्याच प्रयत्नात त्यांना लगेच यश मिळते.

Similar questions