India Languages, asked by Alkmer, 1 year ago

An essay on importance of book in Marathi language plz .

Answers

Answered by KunalRanjan
17
I hope this will help you and try to follow
Attachments:
Answered by halamadrid
86

Answer:

प्रत्येकाच्या जीवनात पुस्तकांचे खूप महत्व असते. पुस्तकांना मनुष्याचा चांगले मित्र म्हटले जाते.पुस्तकांमुळे आपल्याला विविध गोष्टींचे ज्ञान मिळते.जगाबद्दल,पर्यावरणाबद्दल,इतिहासाबद्दल,पौराणिक कथांबद्दल,वीर पुरुषांबद्दल,जुन्या काळाबद्दल माहिती मिळते.

पुस्तकांचे वेगवेगळे प्रकार असतात.प्रत्येक पुस्तक आपल्याला काही न काही चांगल्या गोष्टी शिकवते.एखादे पुस्तक वाचल्यावर आपले मन शांत होते.पुस्तक वाचताना आपण एका वेगळ्याच दुनियेत हरवून जातो.पुस्तक वाचल्यामुळे आपले आत्मविश्वास वाढते,आपले व्यक्तिमत्व विकसित होते,आपली मनःस्थिति बदलते,आपले विचार सकारात्मक होतात.

पुस्तकांमुळे आपली विचार करण्याची शक्ती वाढते.पुस्तक वाचल्यामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो.त्यामुळे आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढते.पुस्तक आपल्याला कधीच एकटे सोडत नाही.नेहमी आपली मदत करत असतात.

Explanation:

Similar questions