अनुभि एक मोठा गुरू essay
Answers
Answer:
आपण जन्मल्याच्या पहिल्या क्षणापासून ते शेवटचा श्वास घेईपर्यंत अनुभवच घेत असतो. कारण कुठलाच क्षण आपण त्याआधी अगदी तसाच अनुभवलेला नसतो. जरी प्रसंग तसाच असला तरी आपण बदललेले असतो.
आयुष्याच्या पहिल्या चारएक वर्षात आपले आईवडील आपले गुरू असतात. नंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षक, पुस्तके, मित्र, कामाच्या ठिकाणी बॉस ते एखाद्या टप्प्यावर अध्यात्मिक गुरुसुद्धा काही लोकांना मिळतो. नाहीतर नकळत मार्ग चुकायचा संभव जास्त आहे.
आता हे गुरू आपल्याला भेटले नाही तर आपण अनुभव घेणार नाही का? तर अनुभव तर घेतच राहणार पण कोणता अनुभव घेऊ, तो कसा स्वीकारू आणि त्यातून काय शिकू ते महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. एक उदाहरण घेऊन माझा मुद्दा जरा स्पष्ट करतो.
तुम्ही एका ट्रेकला चालला आहात. अगदी डोंगर चढायची माहिती तुम्हाला असेल तरी जर त्या ठिकाणी पहिल्यांदा जात असाल तर कुठला अनुभव जास्त चांगला असेल? एकट्याने धडपडत, चुकतमाकत जाण्याचा का वाटाड्याला बरोबर घेऊन व्यवस्थित ट्रेक आणि त्या स्थानाची मजा घेण्याचा? हां आता जर तुमचा उद्देशच जर मी एकटा जाऊन बघतो काय होतं. मग अगदी पुढच्या वळणावर काय आहे दिसलं नाही म्हणून कड्यावरून पडलो तरी चालेल असं ठरवून निघालात तर गोष्ट वेगळी.
मला असं वाटतं की आयुष्य हे एका maze किंवा जंतरमंतर सारखं आहे. तुम्हाला सुरुवात कुठून करायची ते माहीत आहे आणि शेवटचे स्थानापर्यंत पोचायचे आहे. तिथपर्यंत जाण्याचे अनेक मार्ग दिसत आहेत पण सगळेच सरळ तिथे घेऊन जाणारे नाहीत. गुरू नावाचा दिशादर्शक नसेल तर तुम्ही मार्ग चुकाल, परत येऊन नवीन मार्ग शोधायला लागेल. याचा अर्थ तुम्ही शेवटी पोचणार नाही असं नाही पण प्रवास कसा असेल काय माहीत!
योग्य जागी, योग्य वेळेला मार्गदर्शन करणारा भेटला तर जीवनातही जे अनुभव घ्याल ते आयुष्य समृद्ध करणारे असतील. असे अनुभव घेऊन तुम्ही पण कोणाचे तरी गुरू व्हाल. थोडक्यात गुरूंच्या मार्गदर्शनाने जे अनुभव मिळतील ते जास्त मोठे गुरू आहेत असं मला वाटतं.