अन्नवस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेले करार
Answers
Answer:
अण्वस्त्र प्रसारबंदी करार (इंग्लिश: Nuclear Non-Proliferation Treaty) हा विध्वंसक अण्वस्त्रांची वाढ थांबवण्यासाठी जगातील बहुतांशी देशांनी मान्य केलेला करार आहे. १ जुलै १९६८ रोजी आयर्लंड व फिनलंड ह्या देशांनी हा करार जगापुढे मांडला. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंग्डम व चीन ह्या अण्वस्त्रे बाळगणाऱ्या ५ राष्ट्रांसह एकुण १८९ देशांनी आजवर अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सह्या केल्या आहेत.
भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया व इस्रायल ह्या चार अण्वस्त्रधारी राष्ट्रांनी मात्र अण्वस्त्र प्रसारबंदी करार नाकारला आहे. ह्यापैकी भारत, पाकिस्तान व उत्तर कोरियाने जाहीरपणे अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत, तर इस्रायलकडे अण्वस्त्रे असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.
अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे एकुण तीन स्तंभ वर्णन केले गेले आहेत.
Explanation: