India Languages, asked by ushasant13, 1 month ago

अनुताई वाघ यांच्यासाठी वापरलेली विशेषणे​

Answers

Answered by rameshrajput16h
0

Answer:

अनुताई बालकृष्ण वाघ (जन्म : मोरगाव, पुणे, १७ मार्च १९१०; २७ सप्टेंबर १९९२,कोसबाड) या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.[१]

जीवन:अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले. असे असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या. कोसबाडच्या टेकडीवर आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेलाच 'कोसबाड प्रकल्प'म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बालसेविका ट्रेनिंग काॅलेज इ. शैक्षणिक संस्था सुरू केल्या.

Similar questions