अनाथ मुलगा - रोज सकाळी वर्तमान पत्राचे वाटप - दुपारी शाळेत जाताना रस्त्यात
एक पाकीट मिळते - वर्गशिक्षकांना देणे - पाकिटात माणसाचे नाव व पला चौकीत देणे -
माणसाला आनंद हरवलेली वस्तू मिळाली- मुलाला बक्षीस व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे
- तात्पर्य
Answers
उत्तर :
★ कथालेखन :
रोजच्याप्रमाणे गौतम सकाळीच उठला. त्याची रोजची दैनंदिन कामे उरकुन तो शाळेत जात असे. गौतम अनाथ होता त्यामुळे त्याला स्वतः काम करून शिकवणीसाठी पैसे गोळा करावे लागत होते.
गौतम वर्तमानपत्र वाटपाचे काम करत असे. ते काम उरकून मग तो शाळेत जात असे. एकेदिवशी शाळेत जाता जाता त्याच्या पायाखाली काहीतरी वेगळीच वस्तू आली असे त्याला जाणवले. त्यांनी वाकून पाहिले तर ते पैशाचे पाकीट होते. त्याने आश्चर्याने आणि घाबरून ते पाकीट उचलले . कुणालाही काही न बोलता तो शाळेत हजर झाला.
शाळा सुरू झाली पण त्याचे मन बेचैन होते ही गोष्ट वर्ग शिक्षकांच्या नजरेत आली. त्यांनी त्याला विचारल्यावर गौतमने पैशाचे पाकीट वर्गशिक्षकांना दाखविले. वर्गशिक्षकांनी पाकीट उघडल्यावर त्यात त्या व्यक्तीचा पत्ता तसेच नाव होते. वर्गशिक्षकांनी पाकिटातील सर्व माहिती पोलिसांना दिली.
दोन दिवसांनी एक तरूण ते पाकीट नेण्यास आला . पुरावे आणि ओळखपत्र दाखवून त्यांनी पाकीट आपल्या ताब्यात घेतले ते पाकीट बघून त्याचा आनंद गगनात मावेना. कारण त्या पाकिटामध्ये अति महत्त्वपूर्ण कागदपत्रे होती. त्याला गौतम बद्दल समजल्यावर त्याने त्यास बक्षीस दिले आणि त्याच बरोबर त्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी संपूर्णतः मदत करण्याची जबाबदारी पण घेतली.
तात्पर्य : प्रामाणिक पणाचे फळ सदैव चांगलेच असते.
Step-by-step explanation:
- एका गावात बदनावर एक गरीब मुलगा रहत होता तो अनाथ होता तो रोज शकारी वर्तमानपत्रे टाकाया ला घरोघरी जाते थे वह त्यानंतर दुपारी 7:30 बजे एके दिवशी साडे तुझा ताना त्याला 1071 पैशाचे पाकिट मिलते थे वादे पाकिट तो प्रमाणिक पड़े वर्ग शिक्षा करें दे तो सेवा वर्ग शिक्षक पात्रता वर पता व माल का अच्छा ना पाऊं पुलिस चौकी जमा करता सेवा पुलिस वाला माल का अच्छा पुलिस चौकी गुलाब उनके तार व संगठन की तुमची हरवलेली वस्तू सा पढ़ लिया है