अन व शेती पर्यावरण आणि ऊर्जा या जैव तंत्रज्ञान तील घटक स्पष्ट करा
Answers
Answer:
अन्न
शेती व्यवसाय हा आज विविध पद्धतीने केला जातो व अत्याधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानाचा वापर करून केला जातो आहे. असे असले तरी आजही शेती नैसर्गिक मुक्त वातावरणात केली जाते. वातावरणातील विविध बदलांचा परिणाम हा शेतीवर (पिकावर) चांगला किंवा वाईट अशा स्वरुपात होत असतो. पर्यावरण आणि वातावरण हे एकमेकांशी संलग्न आहेत. शेती व्यवसाय किंवा पिकांची व्यवस्थित वाढ व कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी पर्यावरण समृद्धी चांगली असणे हे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. त्यासाठी गावोगावी पर्यावरणाचे रक्षण करणे हे शेती क्षेत्रासाठी व सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट बनली आहे.
आपल्या देशाचा विचार केल्यास पर्यावरण संरक्षणासाठी विविध प्रकारचे कायदे बनवून सरकार पर्यावरण बचावासाठी प्रयत्नशील आहे. परंतु प्रत्यक्षात पर्यावरणविषयक कायद्यांची अंमलबजावणी म्हणाव्या तितक्या प्रमाणात आजही होत नाही व पर्यावरण संरक्षणासाठी होणारे विविध प्रयत्नही अपुरे वाटतात. असे असले तरी त्यात सुधारणा होईल अशी अशा बाळगण्यास हरकत नाही.
शासनाव्यतिरिक्त एक शेतकरी किंवा गावकरी/ नागरिक म्हणुन आपणही काही छोट्या-छोट्या गोष्टींमधून पर्यावरण वाचविण्यास हातभार लावू शकतो किंबहुना खारीचा वाटाही उचलू शकतो. कारण सर्वच गोष्टींमधून पर्यावरण वाचविण्यात शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. देशात शेतक-यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पर्यावर समृद्धीचे फायदे नक्कीच आपल्या देशाला व कृषी क्षेत्राला लाभदायक ठरणार आहेत. एक शेतकरी किंवा ग्रामस्थ, नागरिक म्हणून आपण पुढील गोष्टी करू शकतो.
आपल्य शेतात/गावात शक्य त्या ठिकाणी पर्यावरण पूरक देशी वृक्षांची लागवड व संगोपन करणे
शेतातील, परिसरातील वृक्षांची होणारी तोड थांबविणे
विविध शासकीय योजनांचा पाठपुरावा करून अथवा लोकसहभागातून गावांतील जल/ मृदा संधारणाची कामे करणे
पर्यावरणास घातक रासायनिक औषधांची फवारणी टाळणे. रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळणे
शेतमाल अवशेषांपासून खत निर्मिती करणे
महत्त्वाचे स्वतःकडून किंवा शेतमजूर अथवा नागरिकांकडून होणारी पशु-पक्ष्यांची शिकार थांबविणे
शेती क्षेत्रात प्लास्टिकचा वापर कमीत कमी करणे अथवा उर्वरित प्लास्टिक कुठेही न फेकता व न जाळता ते शक्यतो रिसायकलिंगसाठी देणे.
ह्या व इतर बहुतेक आवश्यकच गोष्टी आपण पर्यावरण बचावासाठी एक शेतकरी किंवा ग्रामस्थ/नागरिक म्हणू करू शकतो.
नक्कीच काहींना ह्या गोष्टी अनावश्यक किंवा आपली जबाबदारी नाही किंवा शक्य नाही अशा वाटू शकतात. परंतु, आता आपल्याला हे विसरुन चालणार नाही की आपला देश कृषीप्रधान आहे व जोपर्यंत आपली नैसर्गिक विविधता (जैवविविधता) व पर्यावरण संपत्ती ही उत्तम होती, तोपर्यंत शेतपिकास चांगले दिवस होते.
सध्या आपल्या देशाची नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण हे दिवसेंदिवस ढासळत चाललेले आहे व त्याचे वाईट परिणामही सध्या कृषी क्षेत्र प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या भोगत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी वे देशाच्या पर्यावरण समृद्धीसाठी शासकीय प्रयत्नांबरोबरच आता प्रत्येक शेतकरी, ग्रामस्थ व नागरिक यांच्याकडून प्रत्यक्ष
कृतीशील व यशस्वी प्रयत्न व्हावेत व प्रत्येकाने नक्कीच अशी सुरुवात केल्यास पर्यावरण समृद्धीत वाढ होऊन शेती क्षेत्रासाठी, शेती पिकांसाठी सुजलाम सुफलाम दिवस येतील ह्यात शंका नाही.
Step-by-step explanation:
जैव तंत्रज्ञान:
बायोटेक्नॉलॉजी हे जीवशास्त्रचे विस्तृत क्षेत्र आहे ज्यात उत्पादने विकसित करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी सजीव प्रणाली आणि जीव यांचा समावेश आहे, किंवा “विशिष्ट उपयोगासाठी उत्पादने किंवा प्रक्रिया तयार करण्यासाठी किंवा प्रक्रिया करण्यासाठी जैविक प्रणाली, सजीव किंवा त्याचे व्युत्पन्न करणारे कोणतेही तंत्रज्ञानिक अनुप्रयोग.
कृषी जैव तंत्रज्ञान:
पारंपारिक प्रजनन तंत्रांसह, कृषी जैव तंत्रज्ञान साधनांची एक श्रेणी आहे, जी उत्पादने बनवण्यामध्ये किंवा सुधारित करण्यासाठी पारंपारिक प्रजनन तंत्रासह जिवंत जीव किंवा जीवनांचा भाग बदलू शकते; वनस्पती किंवा प्राणी सुधारणे; किंवा विशिष्ट कृषी वापरासाठी सूक्ष्मजीव विकसित करा.
पर्यावरण जैव तंत्रज्ञान:
पर्यावरणीय बायोटेक्नॉलॉजी ही एक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी ज्ञानाची एक प्रणाली आहे जी सूक्ष्मजीव आणि त्यांच्या उत्पादनांचा वापर संबंधित घन, द्रव आणि वायूजन्य कचर्याच्या जैवतंत्रण, प्रदूषित वातावरणाचे बायोमेडिएशन आणि पर्यावरणाचे जैविक निरीक्षण यांद्वारे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी करते.