India Languages, asked by y882, 7 months ago

अनियमित पाणीपुरवठा करणारे तक्रार पत्र मा. विभागीय अधिकारी, पाणी पुरवठा विभाग बोरीवली मुंबई. यांना लिहा .​

Answers

Answered by mad210216
33

पत्र लेखन.

Explanation:

१०१, रजनी बिल्डिंग,

पारसिक रोड,

रमननगर,

ठाणे.

दिनांक : २२ जुलै,२०२१

प्रति,

विभागीय अधिकारी,

पाणीपुरवठा विभाग,

बोरीवली महानगरपालिका,

मुंबई.

विषय: अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल तक्रार करणारे पत्र.

माननीय महोदय,

मी, नितेश जोशी, रमननगरचा रहिवाशी आहे. गेल्या १२ दिवसांपासून आमच्या परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे, त्यामुळे आम्हाला खूप समस्या होत आहेत.

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आमची महत्वाची कामे वेळेवर होत नाहीत. नळाला काही मिनिटांसाठीच पाणी येते, त्यामुळे घरात पिण्याचे पाणी सुद्धा योग्य प्रमाणात मिळत नाही.

याशिवाय, आमच्या परिसरापासून विहीर फार लांब आहे, म्हणून, रोज विहिरीवर जाणे त्रासदायक होते.

मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर या समस्येतून आम्हा सगळ्या रहिवाशांची सुटका करा.

कळावे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपला विश्वासु,

नितेश जोशी.

Similar questions