अण्णा भाऊंच्या राहणीमाणाचे वर्ण न तुम च्या शब्दात कराanswer to question
Answers
Answer:
plz make me brainlist......
and ols follow me...
Explanation:
अण्णा भाऊ आठवले की, प्रथम मला अपराध्यासारखे वाटते. प्रतिकूल परिस्थितीत अण्णा भाऊंनी केलेल्या एकूण कार्य आणि अनुकुल परिस्थितीत आम्ही जोपसलेली निष्क्रियता ही समोरासमोर टाकली की पृथ्वीच्या पोटात गडप व्हावेसे वाटते. नंतर आठवते ती आण्णा भाऊंची शेहेचाळीस सालच्या सुमाराला पाहिलेली शाहिरी मुद्रा.त्या वेळी अण्णा भाऊ,दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख हे ब्रम्हा-विष्णू-महेशाच्या तेजाने तळपत होते.अंगाला हात लावला तर भाजून निघेल असे वाटायचे.ते दिवस आठवले म्हणजे अण्णा भाऊंच्या वा्ङमयाचा विचार क्षणभर बाजूला राहतो,अंगावर कोसळते ती या माणसाची कडवी जिद्द.
सॅमसंगचा हा फोन लाँचिंगआधीच स्वतःला सिद्ध करणार
'फकिराचा' हा भाचा आपले संबंध आयुष्यात जिद्दिने जगला.वाळवे तालुक्याचा वारसा त्याला पाळण्यात भेटयला आला.जन्माला दोनचार दिवस झाले नाहीत तोच फकीर इंग्रजांचा खजिना लुटून,घोडदौड करीत वाटेगावाला आण्णा भाऊंच्या झोपडीपुढे दत्त झाला आणि घोड्यावरून न उतरता दोन ओंजळी सुरती रुपये बाळबाळंतीसाठी देऊन पुढे गेले.त्या टापांची लय अण्णा भाऊ पुढे कधीच विसरले नाहीत.अण्णा भाऊ दोन दिवस शाळेत गेले; पण तिसऱ्या दिवशी मास्तरांनी अंगावर रूळ फेकल्याबरोबर तिडकेसरशी शाळोतून चालते झाले. अण्णा भाऊंचे पुढील सर्व शिक्षण अनुभवाच्या शाळेत झाले. अण्णा भाऊंनी अनेक कामे केली.कल्याणला त्यांनी बापाबरोबर कोळसे भरले;मुंबईत फोरीवाल्यापाठोपाठ त्यांचे गाठोडे घेऊन ते हिंडले; बापू साठेच्या तमाशात लुगडे नेसून नाचले;मोरबाग गिरणीत ते प्रथम झाडूवाले झाले(अल्पवयी असल्यामुळे इन्सपेक्टरने पाहिले तर काम जाईल या भीतीने संडासात अनेकदा लपून बसले.);पुढे त्रासन डिपार्टमेंटमध्ये कसबी कामगार बनले;त्याच सुमारास पायाच्या बॅंडेजमध्ये पत्रे लपवून संदेश पोचवणारे कम्युनिस्ट कार्यकर्ते म्हणून वीवरले.या सर्व धडपडीमध्ये दोन ओंजळी सुरती रुपये देणार फकीर अण्णा भाऊंना पुन्हा कधीच भेटला नाही.अण्णा भाऊंचे काही दोस्त पुढे थोडेफार दुरावले;संसार दुभंगला शरीर कोसळू लागले; पण दारीद्र्याशी त्यांनी केलेली दोस्ती शेवटपर्यंत टिकली.आयुष्याची ही सर्व परवड त्यांनी ज्या कलंदरी वृत्तीने व जिद्दीने झेलेली त्याला तोड नाही.त्यांचे उभे आयुष्य म्हणजे साम्यवादाने झपाटलेली एक जळती चूड होती.त्यांचे वाङमय म्हणजे त्या चुडीतून उडालेल्या काही ठिणग्या;काही पेटवणाऱ्या, काही डागणाऱ्या, काही झोंबणाऱ्या ,काही झोंबता झोंबता हसवणाऱ्या.
त्यांच्या वाङमयाचा स्थायिभावसुद्धा जिद्द हाच आहे; जिद्द आणि एकलक्षीपणा. फेरीवील्यामागोमाग हेलकरी म्हणून फिरायली लागण्यापूर्वी थोडेच दिवस त्यांना अक्षरओळख घडली होती.अण्णा भाऊ फेरीवाल्यामागोमाग पुढे न जाता मुंबईच्या रस्त्यावरील पाट्या वाचीत ठिकठिकाणी उभे राहत.फेरीवाला कंटाळला. 'ह्ये पोरगं येडं व्हनार' असे आपले भविष्यही त्याने अण्णा भाऊंच्या बापाला सांगितले.आणि ते भविष्य खोटे ठरले नाही. आण्णा भाऊंना एका ऐवजी दोन वेडे लागली; एक साम्यवादाचे आणि दुसरे वाङमयाचे. मात्र आण्णा भाऊंच्या दप्तरी ती दोन्ही वेडे वेगवेगळी नव्हती.कम्युनिस्ट होत असतानाच ते स्टॅलिनग्राडच्या पवाडही त्रासन विभागात मिळणाऱ्या कागदाच्या चिऱ्होट्यावर लिहू लागले होते.बहुधा लढाई आधी आणि पोवाडा नंतर असा मामला असतो;पण अण्णा भाऊंचा हा पवाडा अगदी वेगळ्या पद्धतीने घडत होता. लढ्याची सुरुवीत झाली तेव्हा पोवीच्याला सुरुवात झाली;लढ्याला जोर चढू लागला कसा रचनेचा वेग वाढू लागला;आणि लढा संपला तेव्हाच पोवाडाही संपला. आण्णा भाऊंनी आपल्या पुढच्या हयातीत दहा-बारा कादंबऱ्या,शे-दिडशे गोष्टी,पुष्कळ तमाशे व अनेक शहरी गाणी लिहिली.ते झपाट्याने व झपाटल्यासारखे लिहित गेले.या सर्वांमध्ये संघर्षशील जिद्दिला त्यांनी मुख्य रसाचे स्थान दिले बाकीचे चिल्लर रस म्हणजे नाटकातील दुय्याम पात्रे. सूत्ररूपाने बोलावयाचे तर त्यांनी जन्मभर पून्हा 'फकीराच' लिहिला.
आणि म्हणूनच आण्णा भाऊंच्या वाङमयाटा विचार करू लागले की माझे मन अस्वस्थ होते.या माणसाने जे लिहिले त्यापेक्षा हा माणूस जे लिहू शकला असता त्याचा विचार टाळता येत नाही. आण्णा भाऊंच्या प्रतिमेला जीवनाचा वेग होता; भाषेची मुळे मातीत होती; सृजनशीलतेला साथ उद्योगीपणा होता.एतके असूनही चिरंतन असे वाङमयीन मूल्य निर्माण होण्यासाठी जीवनाची व वाङमयाची जी व्यापक व मूलगामी समज पाहिजे ती आण्णा भाऊंच्या प्रकृतीत नाही.ती येण्यासाठी शक्तीला संयम भेटावा लागतो,भावनेला
चिंतन भेटावे लागते आणि तिडिकेला तटस्थता भेटावी लागते.आण्णा भाऊंच्या वाङमयात गाठीभेटी क्वचितच घडतात.त्याची कारणे अनेक असू शकतील; कोणी त्याची जबाबदारी साम्यवादी विचारधारेवर ढकलून मोकोळे होतील; कोणी त्यांच्या आयुष्याची जी परवड निघाली तिच्यावर टाकतील; कोणी आपल्या ग्रथांची भारतीय व परकीय भाषांमध्ये भाषांतरे झाली या जाणिवेतून निर्माण होणाऱ्या आण्णा भाऊंच्या आत्मसंतुष्ट वृत्तीवर टाकतील.