अण्णाभाऊ साठे यांच्यावर मराठीतून भाषण
Speech on annabhau sathe in Marathi language
Answers
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात झाला.त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊ साठे होते. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला शाहीर म्हणून प्रचलित होते. अण्णाभाऊ साठे हे निरक्षर अशिक्षित होते तरी सुद्धा मराठी भाषेतील त्यांनी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी लिहिले. तसेच मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार त्यांनी उत्तम रित्या हाताळले. लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा वापर त्यांनी सामान्य जनतेचे मनातील विचार बदलण्यासाठी केला . तसेच त्यांची माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।। ही लावणी गाजलेली होती. लाल बावटा` हे पथक १९४४ ला त्यांनी कामगारांच्या सेवेसाठी स्थापन केले. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य देशविदेशात पोवाड्यातून सांगितले “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा त्यांनी जनतेला दिला होता. अण्णाभाऊ हे विनोदी स्वभावाचे होते.१९४७ मध्ये क्रांतिकारी नाना पाटील यांच्या सोबत त्यांनी ब्रिटिश विरोधी मोहिमेत सहभाग घेतला होता . तसेच सन १९४८ मध्ये त्यांना विश्व साहित्य परिषदेकडून निमंत्रण देखील मिळाले होते. अण्णाभाऊची फकिरा ही कथा फार प्रचलित होती त्यांनी त्यात १९१० साली मांग समाजाच्या ब्रिटीशांविरोधी लढ्याचे वर्णन या कथेत केले होते.
अण्णानी आपले संपूर्ण आयुष्य घाटकोपर मधील चिरागनगरच्या झोपडपट्टीत काढले.