India Languages, asked by shanaya4012, 9 months ago

andhvishwas ani budhivad ver nibandh marathi language

Answers

Answered by piyu2020
0

Answer:

Explanation:

कोणी काही केले किंव्हा काही सांगितले कि आपण लगेच त्या गोष्टी वर अंध पाने विश्वास ठेवतो आणि कोणता हि विचार न करता त्या गोष्टी अंध पने करतो, अशीच अंधविश्वासाला सुरवात होते.

मित्रांनो आज आम्ही अंधविश्वास ह्या विषयावर एक निबंध आणला आहे तो तुम्ही नक्की वाचा.

आज चे युग हे सर्वात आधुनिक युग आहे, हे तर आपण कितीक वेळा ऐकले असेल, आज बघावे त्या गोष्टीचे तंत्रज्ञान आहे. प्रतेक गोष्ट जेव्हा घडते किंव्हा घडवली जाते त्या मागे एक वैज्ञानिक कारण असते हे आपल्यांना शाळेत शिकवले जाते.

पण सकाळी जेव्हा वृत्तांत पत्र वाचायला घेतला कि एक न एक बातमी असतेच अंधविश्वासा मुळे हे झाले ते झाले. ह्या अंधविश्वासाच्या नादात कितेक लोक रोज मरण पावतात. मला माहित नाही का आणि कसे पण जेव्हा टी.वी वर बातम्या लागतात आणि जेव्हा काही अंधविश्वासा बदल दाखवतात तेव्हा मोठी शिकलेली माणसे ह्या अंधविश्वासाला बळी पडतात माहित नाही का.

पण मला तर टी.वी वर जेव्हा अंधविश्वास पसरव नारे डोंगी दाखवले कि त्यांचे कृत्य बगूनच हसायला येते कोणी कुंकू काय उडवते राख काय फेकतात, झाडू ने झपाटतात आणि वेड्या सारखे ओरडतात. माझे तर हे सगळे बगून हसून-हसून पोट दुखते.

आपल्या घरचे आपल्यांना नेहमी चांगल्या गोष्टी सांगतात पण माहित नाही का ? ह्या अंधविश्वासाच्या गोष्टी आपल्या घरा मधूनच सुरु होतात घरी काही आणल कि नजर काढतात, रस्त्यावर मांजर गेली तर रस्ता अलोंडून जात नाही, कावला घरा वरून गेला आणि ओरडला कि घरी कोणी तर येणार असे अंधविश्वास आपण ऐकले असतील आणि नकळत आपण ते मानतो.

एक गोष्ट मी ऐकली होती ती म्हणजे एका गाव मदे लग्न होत आणि साहजिक आहे जिथे लग्न असणार त्या घरा मदे लोकांचा गोंधळ असतो, ज्या घरा मदे लग्न होते त्यांनी एक मांजर पाळली होती. जेव्हा ब्राम्हण पूजा करत असताना ती मांजर तिथे फिरत होती, त्या मांजरीने तिथे असलेल्या वस्तूचे काही नुकसान करू नये म्हणून त्या ब्राम्हणणे मांजरीला बांधायला सांगितले. मग काय लोकांनी हे पाहिले आणि मांजरीला का बांधले हे कारण न समजता त्यांनी आपल्या मनात घेतले कि लगनाच्या वेळेस मांजरीला बांधणे गरजेचे असते आणि आपण सुद्धा अश्या गेर समजुतीची शिकार बनतो आणि अंधविश्वासाला बळी पडतो.

काही माणसे अगदी साधी भोळी असतात आणि ह्याचा फयदा डोंगी पाखंडी बाबा लोक घेतात आणि त्याच लोकांना ह्याच अंधविश्वासाच्या सहायाने घाबरवतात आणि त्यांना काही हि करून फसवतात आणि भोले-भाबडे लोक त्यांच्या डोंग चाळीत सापडतात.

प्रत्येक गोष्ट हि खोटी नसते, आणि प्रत्येक गोष्ट खरी हि नसते. म्हणूनच योग गोष्टींवर विश्वास दाखवा आणि अंधविश्वास पाळू हि नका आणि कोणाला पाळू हि देऊ नका.

Similar questions