India Languages, asked by shikharagarwal6013, 1 year ago

anekta ekta essay in marathi

Answers

Answered by halamadrid
1

■■अनेकतात एकता■■

'अनेकतात एकता', म्हणजेच खूप सारी विविधता असून ही एकता असणे.हा संदेश भारत देशासाठी योग्य आहे,कारण भारतामध्ये इतर देशांपेक्षा वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे,तरीही भारतामधील लोक आनंदाने व एकतेत राहतात.

आपल्या देशात हिंदू, मुस्लिम, शिख,ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोक राहतात.इतक्या वेगवेगळ्या धर्मांचे लोक भारतात असूनसुद्धा,ते एकमेकांसोबत भांडत नाही आणि 'अनेकतात एकता', हा संदेश आपल्याला देतात.

भारतात हिंदी,मराठी,बंगाली,गुजराती,पंजाबी अशा वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात.पण, तरीही लोक एक दुसऱ्यांच्या भावनांना प्रेमाने समझून घेतात.

आपल्या देशात वेगवेगळे सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात.पण, सगळ्या धर्मांचे लोक या उत्सवांमध्ये आनंदाने व उत्साहाने भाग घेतात.

आपल्या देशातील लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करतात,कठीण परिस्थितीत एकमेकांची साथ देतात,एकमेकांना मदत करतात.म्हणूनच आपला देश 'अनेकतात एकता' या संदेशाचा उत्तम परिचय देतो.

Similar questions