Answer if you can
#no irrelevant Answers acceptable !!
Answers
Explanation:
स्वमत :
" आपण एकमेकांना मदत केली पाहिजे . "
होय मी या विधानाशी सहमत आहे . आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे . हे जग सुद्धा परस्परांवर अवलंबून आहे . एकमेकांना मदत केल्याने आपले आयुष्य अधिक सुलभ होईल असे मला वाटते . एकमेकात मिळून मिसळून राहिल्याने सामाजिक आणि व्यावहारिक जीवनात आपल्याला आधार मिळतो . आपले काम आपल्याला सहजरित्या साधता येते. आपण दुसऱ्याला मदत केली तरच तो आपल्याला मदत करेल . त्यामुळे आपण सर्वांना मदत करणे गरजेचे आहे . मदत ही निःस्वार्थ भावनेनं केली पाहिजे म्हणजे मदत करताना परतफेडीची किंवा फळाची अपेक्षा करू नये . स्वार्थी वृत्तीने केलेल्या कामाला मदत म्हणता येणार नाही . शेवटी कुसुमाग्रज ( विनायक दामोदर करंदीकर ) याच्या एका सुंदर कवितेच्या ओळी आठवतात ,
देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
Extra Information :
→ स्वमत या प्रश्न प्रकारात आपल्याला त्या विधानाबद्दल काय वाटते ते अगदी सोप्या भाषेत लिहणे अपेक्षित आहे .
→ हा प्रश्न 2 गुणांसाठी असतो . उत्तर ८० ते १०० शब्दात लिहावयाचे असते .
→ उत्तरपत्रिका तापसणाऱ्यास मजकूर जास्त महत्वाचा नसून तुम्ही किती मनापासून लिहलाय हे महत्वाचे असते
→ उत्तेराची सुरुवात किंवा शेवट आकर्षक असावा जेणे करून उत्तरपत्रिका तपासणारा अधीक गुण देईल.
→ उत्तेरामध्ये एखादी म्हण , वाक्प्रचार किंवा एखाद्या पद्यातील दोन पंक्ती असल्यास उत्तम .
→ उत्तेरामध्ये महत्वाच्या शब्दांना अधोरेखित करावे . अक्षर सुंदर व वळणदार काढावे . खाडाखोड टाळावी .
→ वरील सल्ले अमलात आणल्यास पैकीच्या पैकी गुण मिळतील