answer me fast please
Answers
आभाळाचे गार्हाणे | ESSAY ON SKY IN MARATHI
केवढे मोठे आभाळ आहे मी ! क्षितिजाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत मी पसरले आहे. अखंड पृथ्वीवर मी माझे छत्र धरले आहे. अनेक कविलेखकांनी माझ्यावर कविता लिहिल्या आहेत. मनोरम लेख लिहिले आहेत. केवढा अभिमान वाटायचा मला ! किती आनंद व्हायचा ! पण आता मात्र तुम्ही माणसांनीच माझी रया घालवली आहे.
काय हे ? असे काय बघत राहिलात ? नाही कळले का ? तुम्ही एकेका ठिकाणीच कारखाने कोंबत चालला आहात. खतांचे कारखाने, रसायनांचे कारखाने, ओषधांचे कारखाने. हे कारखाने उभारलेत तेव्हा मलाही आनंद झाला. वाटले, ही माझी लाडकी पृथ्वी आता खूप विकसित होईल. पण तुम्ही या कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रासायनिक कचऱ्याची काहीच विल्हेवाट लावली नाही. कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराने मला पुरते व्यापून टाकले आहे. मला माझी ती सुंदर पृथ्वी दिसेनाशी झाली आहे.
मी तुमच्या पृथ्वीला माझ्या ओंजळीत घेतले आहे. किती सुरक्षित ठेवलेy होते मी पृथ्वीला ! सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांना मी थोपवून धरते. तुमच्या आरोग्याचे रक्षण करते. ढगांना मीच गोळा करते. तुमच्यावर पावसाचा वर्षाव करते. तुमच्या अन्नाची तरतूद करते, तरी तुम्हांला माझे महत्त्व कळत नाही ? तुम्ही विविध प्रकारच्या शोधांसाठी आकाशात उपग्रह पाठवता, इतर कोणत्या ग्रहावर तुमच्यासारखी मनुष्यवस्ती आहे का? यांसारख्या अनेक गोष्टींचा तुम्ही शोध घेता तेव्हा मला तुमच्या जिज्ञासू वृत्तीचे, बुद्धिमत्तेचे आणि कष्टाळूपणाचे कौतुक वाटते. हल्ली तुम्हांला अस्मानी संकटांची चाहूल आधीच लागते; त्यामुळे प्राणहानी टळते. तुम्हा सर्वांची प्रगती व्हावी हीच माझी सदिच्छा!
फक्त मलाच त्रास होतो, असे नाही. सगळीकडे रोगराई पसरत आहे. पशुपक्षीसुद्धा त्रस्त झाले आहेत. त्यांची संख्या रोडावत आहे. वृक्षवेली लयाला चालल्या आहेत. माणसांनो, तुमच्या नाशाची घंटा वाजू लागली आहे. सावध व्हा, या प्रदूषणाविरुद्ध युद्ध सुरू करा.
हवा आणि आकाश प्रदुषणावर निबंध येथे लिहीला आहे.
Sorry for taking so much time
Answer:
heya wassup ... tumhare classes kese chl rhe hai .. hope you are good