Geography, asked by sagarsahu23321, 5 months ago

Antarjalachya madhyamatun bharatamadyrnghadaleli bhuskhalanachi ghatana shodhakartaaon va tyavishai thodkyat liha

Answers

Answered by rehmaasad
0

Answer:

What's your question!?????

Answered by divyaaptekar33
0

Answer:

भूस्खलनाचा धोका आणि भूस्खलनाच्या घटना फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे फक्त जीवित व वित्तहानीच होत नाही, तर सरकारी तिजोरीवरही फार मोठा भार पडतो.

भूस्खलामुळे पीडित झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी निधी कमतरता जाणवू लागली की इतर विकासकामांसाठी वापरत असलेला पैसा या दुर्घटनेकडे वळवायची वेळही कधी कधी येऊ शकते. भूस्खलनाचा धोका कधी अस्पष्ट असतो, तर कधी स्पष्ट. भारतात पश्चिम घाट, निलगिरी व हिमालय पर्वतांच्या कुशीत हा धोका वाढू लागला आहे.

हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे. जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीकीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो, पण पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुतकरून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते.

पठारी प्रदेशात काही वर्षापूर्वी लोकसंख्या इतर ठिकाणांपेक्षा दाट होती, पण मागील काही दशकात लोकांची पर्वतांच्या कुशीत राहण्याची हौस किंवा अपरिहार्यता वाढत चालली आहे. घाटात आता लोक दाटीवाटीने वस्त्या उभारू लागले आहेत. आणि या वस्त्या स्थापन करताना पर्यावरणाशी सांगड किंवा पर्यावरणाशी हितगूज साधत वस्ती निर्माण करण्याची तसदी कोणी घेताना दिसत नाही.

कडयांचा उतार किती अंशाने आहे, तिथे पर्जन्यमान कोणत्या प्रकारचे आहे, पाऊस सलग पडतो की थांबून थांबून, आद्र्रता किती व कशी टिकून राहते, पाण्याचा निचरा लवकर होतो की वेळ लागतो, मातीची गुणवत्ता कशी आहे व कोणत्या प्रकारची माती तिथे आहे, ही माती किती प्रमाणात पाणी आपल्यात सामावून ठेवू शकते, अशा व इतर अनेक प्रश्नांचे निरसन न करता आपण पर्यावरणाशी विसंगत वागत आपल्या नवीन राहत्या जागा बनवत आहोत. आणि ही फार मोठय़ा चिंतेची बाब आहे.

भूस्खलन ही एक नैसर्गिक आपत्ती आहे व भूस्खलनाची व्याख्या ते स्खलन कोणत्या प्रकारे व कोणत्या घटकात होते याच्यावरून केली जाते. घसरणे, वाहणे, प्रवाहित होणे, पडणे, कोसळणे किंवा प्रसार होण्याच्या पद्धतीवरून तसेच खडक किंवा मातीच्या प्रकारावरून भूस्खलनाला व्याख्येत बसवले जाते. त्यामुळेच जरी आपल्याला तपशिलात जाण्याची गरज नसली तरी त्याची थोडीफार माहिती असणे गरजेचे ठरते.

भूस्खलनातील ‘भू’ हे जाणकारांसाठी माती किंवा खडक किंवा या दोघांचे मिश्रण व ‘स्खलन’ म्हणजे त्यांच्यासाठी घसरण, प्रवाह, पडणे, कोसळणे किंवा प्रसारित होणे असू शकते. भूस्खलन काही वेळेला फक्त काही मीटर अंतर होते, तर कधी कधी एखाद्या मैलापासून कित्येक मैलही होऊ शकते. जिथे उतार असतो अशा ठिकाणी या नैसर्गिक आपत्तीचा धोका जास्त असतो.

जिथे जास्त उतार तिथे भूस्खलन होण्याची अधिक शक्यता असते. अशा ठिकाणी जर ठिसूळ माती वास करून असेल व पावसाची रिपरिप सातत्याने होत असेल, तर भूस्खलनाची क्रिया अधिक गतीने व तितक्याच तिव्रतेने होण्याची शक्यता असते.

क्षरणाची क्रिया सुद्धा भूस्खलनाला कारणीभूत ठरू शकते. या नैसर्गिक आपत्तीमुळे १९०० ते २००९ दरम्यान जागतिक स्तरावर ६१ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हजारो, लाखो, करोडो रुपयांचे नुकसानही विविध देशांना सोसावे लागले आहे.

भूस्खलनाचा एक महत्त्वाचा घटक आहे तिथल्या प्रदेशाची भूशास्त्रीय संरचना व हवामान परिस्थिती. भौगोलिक व भूशास्त्रीय परिस्थिती ही प्रादेशिक पातळीवर वेगवेगळी असू शकते. पण हवामान व पर्जन्यमान हे मात्र स्थानिक गोष्टींवर आधारित नसतात. त्यांचा पसारा वैश्विक असतो.

गेल्याच आठवडय़ात आपण आपला पाऊस कोणत्या ‘आंतरराष्ट्रीय’ घटकांवर अवलंबून असतो हे पाहिलेले आहे, पण जर डोंगरकपारीत भूस्खलनासाठी पोषक वातावरणनिर्मिती झाली तर तो दोष निसर्गाचा नसून आपलाचा असतो.

शेती किंवा घर बांधणीसाठी डोंगर जेव्हा सपाट केले जातात तेव्हा एका बाजूच्या डोंगराचा उतार तसेच या उताराचा कोन आपण आपसूक वाढवत असतो. हा उतार नंतर काही पावसामुळे झेलल्यानंतर भूस्खलनाला पोषक ठरतो. असा पट्टा संशोधन करून अधोरेखित करण्यात आला आहे. त्याबद्दल पुढच्या लेखात..

Similar questions