Anupras alankar example in marathi
Answers
Answer: अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.
अनुप्रास अलंकार – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. हा शब्दालंकाराचा प्रकार आहे.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती).
Explanation: