India Languages, asked by bhumiawargaonkar, 4 months ago

Any marathi Vaicharik Nibandh for 10th​

Answers

Answered by SuryaTrinath
1

Answer:

विद्यार्थ्यांना सूचना : निबंधासाठी माहिती शोधण्यासाठी आधी मराठीत शोध घेता आला पाहिजे आणि म्हणून मराठी टायपिंग कसे करावयाचे त्याची माहिती घेतली पाहिजे. उजवीकडे व्हीडिओ क्लिपेत दाखवल्याप्रमाणे मराठी टायपिंगची माहिती घ्या आणि मग मराठीतून माहिती शोधा.

या विद्यार्थीप्रिय लेखात निबंधाबद्दल ज्ञानकोशीय माहिती आहे (थोडक्यात निबंध म्हणजे काय ? कसा असतो त्याचे प्रकार, घटक इत्यादी). निबंधांबद्दल ज्ञानकोशीय माहिती घेतल्यानंतर; इच्छुक वाचक विद्यार्थ्यांसाठी मराठी विकिबुक्स या बंधुप्रकल्पात निबंधलेखन कसे करावे ? हा मार्गदर्शनपर लेख उपलब्ध आहे.

निबंध हा आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार आहे.[१] निबंधाच्या अनेकांनी अनेक व्याख्या केल्या आहेत." नि+बन्ध = बांधणे "असा अर्थ विचाराला बांधणे आणि बंधन या अर्थाने वापरल जातो. निबंधात साधक-बाधक चर्चा असते.[२] निबंध हा एक स्वतंत्र साहित्य प्रकार आहे.

निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारा, उपयोजनेसाठी अनुसरून अभिप्रेत लांबीचा तरीही संक्षिप्त, नीटपणे मांडलेला विचारांनी युक्त असा मुद्देसूद लेख. रावसाहेब गणपतराव जाधव यांच्या मराठी विश्वकोशातील मतानुसार," लक्षणेने एखाद्या विषयासंबंधी संगतवार रचलेले वा उभारलेले मध्यम व्याप्तीचे लेखन म्हणजे निबंध होत".[१] यात निबंधलेखकाच्या व्यक्तिगत दृष्टिकोणांच्या मांडणीचासुद्धा समावेश असतो. वेगवेगळ्या परिच्छेदातून विविध बाजू निबंधात मांडलेल्या असतात. व्यवस्थित सुरुवात आणि विषयाची प्रयत्‍नपूर्वक मांडणी हे निबंधलेखनाचे प्रमुख उद्दिष्ट असते.

निबंध या शब्दाचा अर्थ सांगतांना ज्येष्ठ समीक्षक मो.रा.वाळंबे म्हणतात' "निबंध या शब्दाचा अर्थ बांधणे, गुंफणे, जुळविणे, असा आहे." निबंधात जी आपण जुळणी किंवा गुंफणी करतो ती आपल्याला सुचणाऱ्या विचारांची. एखादा विषय निबंधलेखनाला दिला, की त्याच्याबद्दलचे अनेक विचार आपल्या मनात एकत्र गर्दी करतात, पण ते सारेच विचार दुसऱ्याला सांगण्यासारखे असतात असे नाही, शिवाय सुचणारे विचार खूप विस्कळीत असतात, हे असे सुचणारे विचार निबंधामुळे एकत्रित होतात.[३]

कलाक्षेत्रात संकल्पना अथवा विषयांच्या निबंधस्वरूप मांडणीसाठी लेखनापलीकडे जाऊन चित्र, छायाचित्रे, ध्वनी, संगीत, वृत्तचित्र (डॉक्युमेंटरी), अनुबोधपट, ही माध्यमेही वापरली जात

व्याख्या संपादन करा

निबंधाची व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. एक व्याख्या अशी आहे की, " चर्चित विषयाबद्दल लक्ष्यकेंद्रित गद्य रचना " किंवा " पद्धतीशीर दीर्घ प्रपाठ "[४]

Similar questions