India Languages, asked by mansiagrawal330, 2 months ago

any one from them plz help me ​in Marathi

Attachments:

Answers

Answered by salimkhan83273
3

Answer:

पाणी आपले जीवन. पाण्याशिवाय जीवन नाही. हे खरे आहे पण आपण ह्या जीवनाचा आदर राखतो का ? देशातील जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते दुषित होत चालले आहेत. आपण आपल्या हाताने पाण्याचे हे स्तोत्र नष्ट करत आहोत का ? पुढील पिढ्यांसाठी आपण ह्या प्रदूषित नद्या, दुषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा.

अनिर्बंध वाळू उपसा, नद्यांच्या पात्रात अडथळा करणे ह्याने आपण आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळ जवळ दोन तृतीयांश नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत तर बाकीच्या प्रदूषित झाल्या आहेत . शेती साठी लागणारी जमीन आहे पण प्रदूषित पाण्यामुळे पीकही घेवू शकत नाही अशी आपल्या इथल्या शेतकर्याची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन न केल्याने दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे.

जो पाणीसाठा शिल्लक आहे त्यात कारखान्यांमधून होणारे प्रदूषण, नदीकिनारी केली जाणारी धार्मिक कृत्ये, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा ,वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभारच लावत आहोत जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत नि निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशात आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्यांचे मोठ्याप्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाट उचलू शकतो.

Answered by mansisonawane78
1

Answer:

कुटुंब किती छोटा आणि छान शब्द आहे ना परंतु कुटुंब म्हणजे फक्त दोन चार लोकं नाही तर त्या लोकांमधील प्रेम, ते मिळूनमिसळून राहणे त्याला म्हणतात खरं कुटुंब पूर्ण झाले असे.

आमच्या घरात आम्ही एकूण चार लोकं राहतो आई, बाबा, ताई आणि मी असे आमचे चार जणांचे कुटुंब आहे.

कुटुंब आपल्याला संस्कार लावते कारण आपण सर्वात आधी आपल्या कुटुंबातील लोकांकडून शिकतो आणि ते जसे वागतात तसेच आपल्यावर संस्कार होतात. लहानपणी आपल्याला कुणी शिकवत नाहीत ना शाळेत टाकतात कारण तीन वर्षाचा झाल्याशिवाय शाळेत टाकत नाहीत. तर तीन वर्षाच्या आत मुलाला जे काही शिकायला मिळते ते म्हणजे त्याच्या कुटुंबाकडून आणि सभोवतालच्या लोकांकडून त्यामुळे कुटुंब आपल्या जीवनात धडे शिकवण्यासाठी खूप गरजेचे आहे.

आमच्या कुटुंबातील मोठे व्यक्ती म्हणजे माझे बाबा ते आमच्या सर्वांची खूप काळजी घेतात. बाबा दररोज ऑफिसला जातात त्यामुळे आमच्या घरात पैसे येतात आणि आमच्या गरजा पूर्ण होतात. रोज सकाळी बाबा आणि आई देवाची पूजा करतात आणि आरती म्हणतात, अग्गरबत्ती धूप लावतात, पूजा पाठ करतात ज्यामुळे आमच्या संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरते आणि सर्व आनंदी राहतात. त्यांच्यासोबत मी आणि ताई देखील देवाची पूजा करतो त्यामुळे आमचे मन प्रसन्न होते.

Explanation:

my family essay in marathi

hi Mansi me Mansi .

Similar questions