Any one please explain Shabdanchya Jaati (Marathi) in detail....
Answers
शब्दांच्या आठ जाती मराठी भाषेत आहेत.
1. नाम
कोणतीही वस्तू, व्यक्ती, पक्षी, प्राणी, जागा हे नाम आहे.
त्याचे २ प्रकार आहेत.
अ- विशेष नाम - राहुल, कोंबडा, हिमालय
ब-सामान्य नाम - मुलगा, पक्षी ,जागा.
2. सर्वनाम
सर्वनाम असा शब्द आहे जो नामाला संबोधण्यासाठी वापरला जातो. हा शब्द नामाऐवजी वापरण्यात येतो.
उदा- तो, ती, त्याचा
3. विशेषण.
विशेषण हा असा शब्द आहे जो नामाबद्दल अधिक माहिती देतो.
उदा- हुशार, लाडका, सुंदर
4. क्रियापद
क्रियापद असा शब्द आहे जो वाक्यात घडणारी क्रिया सांगतो.
उदा- चालतो, खेळते, खेचला
5.क्रियाविशेषण
क्रियाविशेषण असा शब्द आहे जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो.
उदा- सीमा घाईत घरी गेली. ह्या वाक्यात घाईत हे क्रियाविशेषण आहे.
6. उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्यय असा शब्द आहे जो दोन वाक्याना जोडतो.
उदा- आणि, पण, म्हणून
7. शब्दयोगी अव्यय
शब्दयोगी अव्यय हा असा शब्द आहे जो नामाचे संबंध किंवा जागा सांगतो.
उदा- पुढे , मागे, मुळे
8. केवलप्रयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय हे शब्द आश्चर्य किंवा धक्का दाखवण्यासाठी वापरला जातो.
उदा- अबब, अरेचा.