अप्पा बेलवलकर यांना कोणती पदवी दिली?
Answers
Answer:
I don't know sorry just to take and increase score
Answer:
अप्पा बेलवलकर यांना नटसम्राट ही पदवी दिली.
Explanation:
वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर हे रंगमंचावरचे अतिशय मोठे नट होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य नाटकासाठी घालवले आणि म्हणूनच त्यांना नटसम्राट ही पदवी देण्यात आली. गणपतराव बेलवलकर म्हणजेच अप्पासाहेब बेलवलकर यांनी संपूर्ण आयुष्यभर महाराष्ट्रात नाटकाचे प्रयोग केले. आयुष्यभर केलेल्या मेहनतीतून जो काही पैसा जमा झाला, तो उतार वयात आपल्या मुलांमध्ये वाटून दिला. त्यांना वाटले की आपला मुलगा किंवा मुलगी आपला सांभाळ करेल. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. घरात होणाऱ्या सततच्या भांडणांमुळे आप्पासाहेबांनी आपले घर सोडून मुलीकडे जायचे ठरवले. स्वतःचे घर मुलाला देऊन ते मुलीकडे गेले. मुलीनी देखील त्याचा आनंदाने स्वीकार केला. पण हळूहळू चित्र पालटत गेले आणि एके दिवशी तर मुलीने चक्क चोरीचा आरोप घेतला. ज्या मुलीला लहानाचे मोठे केले सर्व सुख सुविधा दिल्या, त्या मुलीने स्वतःच्या बापावर चोरीचा आरोप घेतला. आयुष्य भर जो अप्पासाहेब बेलवलकर नटसम्राट म्हणून जगला, त्याच्यावर त्याच्याच मुलीने चोरीचा आरोप घेतल्यामुळे त्यांना तो धक्का सहन झाला नाही व त्यांनी रात्रीतच तिचे घर सोडले. दोघीही नवरा बायको आपल्या गावाकडे निघाले, पण रस्त्यातच त्यांच्या बायकोने जीव सोडला. संपूर्ण आयुष्यभर नटसम्राट म्हणून जगलेला अप्पासाहेब बेलवलकर शेवटी एकटेच राहिले. वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट हे विल्यम शेक्सपियर च्या नाटकांवर आधारित नाटक आहे.