India Languages, asked by balkrushanraut700, 5 months ago

अपूर्ण कथा पूर्ण करा #एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहून गेला समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला.........​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहून गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला, 'देश, जात, कुळ या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा हे लक्षात घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा.' त्यावर समुद्रातील एक मासा त्याला म्हणाला, 'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस. जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघंही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण ते कळेल. कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.

तात्पर्य - नुसत्या जात, कुळ यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते

Similar questions