अपठित उतारा क्र.१: (पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र. ८१)
अश्मयुगात माणसाने आपले जीवन सुखाचे करून घेण्यासाठी
चुलीसाठी तीन दगड मांडण्यापासून मृताचे थडगे बांधण्यापर्यंत
दगडाला नाना तहांनी वापरले. त्यांची भांडीकुंडी केली. औते-
हत्यारे बनवली आणि त्यांचे दागदागिने देखील घडवले. खडक
कोरून किंवा दगडाच्या भिता रचून आपल्या निवाऱ्याची सोय केली.
माणसाच्या प्राथमिक गरजा भागवल्यानंतर त्याला आपल्या
सृजनशीलतेला आणि पूजावृत्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले
नाही. फुरसद मिळाली तशी तो लेणी खोदू लागला; शिल्पे कोरू
लागला, घराना कलात्मक आकार देऊ लागला. शिल्प आणि
स्थापत्य या दोन्ही कला झऱ्याप्रमाणे अशा दगडातून फुटल्या आणि
विज्ञानाचा उगम झाला. एक सबंध युग दगडाने माणसाचे जीवन
परोपरीने सुखाचे केल्यामुळे आणि त्याच्या सृजनशीलतेला कला
आणि विज्ञान यांचे उमाळे आल्यामुळे त्याला दगडच देव वाटून
त्याने तो पूजला.
Answers
Explanation: