India Languages, asked by aditya659, 4 months ago

अपयश ही यशाची पहिली पायरी आए हैं या साखी दो वाक्य पुरी चौकटीत लिहा

Answers

Answered by snehachauhan64512
2

Answer:

आजकाल विद्यार्थ्यांची संवेदनशीलता कमी होत चालली आहे. त्यामुळे थोडय़ाशा अपयशानेही तरुण खचून जातात आणि वाईट पर्यायांचा अवलंब करतात.रत्नागिरीतील एका दहावीच्या विद्यार्थिनीची अपेक्षा ८५ टक्क्यांची होती. मात्र अपेक्षापेक्षा कमी गुण मिळाल्याने तिने आत्महत्या केल्याची चर्चा सध्या रत्नागिरीत आहे. केवळ पाच टक्के कमी गुण मिळाल्याने तिने आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावलं. आजच्या विद्यार्थ्यांची संवेदनशीलता एवढी कमी झाली आहे की त्यांना जराशाही अपयशाने भीती वाटते आणि त्या भीतीने ते अगदी टोकाचा निर्णय घेतात.

प्रत्येकाच्या जीवनात येणारे बिकट प्रसंग आणि अपयश नव्याने उभं राहण्याची उमेद देऊन जातात. मात्र आजचे विद्यार्थी बिकट प्रसंगात खचून जातात आणि आयुष्यासमोर कायमची हार मानून बसतात. काहींना तर अपयश पचवण्याची ताकदसुद्धा नसते आणि मग मनात सुरू होतात ते वाईट विचारांचे चक्रीवादळ. आपण प्रत्येक वेळी बोलतो ना, सक्षम आणि सुशिक्षित तरुण हाच भावी देशाचा उत्तम नागरिक आहे. मग हे सर्व बोलताना आजची तरुण पिढी अपयशामुळे, तणावामुळे किंवा दडपणामुळे आपलं आयुष्य संपवताना का दिसते?

जीवन म्हणजे खेळ नव्हे, तर देवाने दिलेली एक सुंदरशी भेट आहे. त्या जीवनाचा कसा अर्थ घ्यायचा, ते सार्थकी कसे लावायचे हे फक्त आपल्याच हाती असू शकते हे एवढं साधं गणित तरुण पिढीला का कळू नये? थोडासा ताण आला की अपयशाचे सावट अवतीभवती फिरू लागले की आयुष्यात आता दुसरं काही आम्ही करू शकत नाही आणि मग देवाने दिलेल्या सुंदर अशा आयुष्याला पूर्णविराम द्यायचा, हा विचार आजच्या तरुण मंडळीत ठाण मांडून बसला आहे.

तारुण्यात आपण घडत असतो, त्यामुळे अनेक स्वप्नं आपल्या गाठीशी असतात. मात्र एखादं स्वप्न अपुरं राहिलं किंवा त्यात यश आलं नाही की आपण पावलं मागे घेतो आणि आयुष्यालाच संपवण्याचा विचार करतो. स्वप्न जरूर बघा, मात्र ते पूर्ण नाही झालं म्हणून मार्ग बदलू नका. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. हल्लीच्या मुलांना बऱ्याचदा झटपट यश हवं असतं.

एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करावी लागते, सहजासहजी काहीच शक्य होत नाही हे कित्येकदा त्यांना समजतच नाही आणि मग आपोआप पावले वळतात ती चुकीच्या निर्णयांकडे. अनेकदा मुलांना आपण काय निर्णय घेतोय त्याचा परिणाम काय आणि कितीसा होईल हे सुद्धा कळत नाही. आयुष्य पहिल्या किंवा दुस-या अपयशावर थांबत नाही किंवा अवलंबून राहत नाही. पुढे खूप काही आहे, त्यामुळे आपण स्वत:ला सिद्ध करून जगासमोर आपली चांगली प्रतिमा तयार करू शकतो हे प्रत्येक मुलाने आपल्या मनावर बिंबवले पाहिजे.

प्रत्येक मुलाची विचार करण्याची क्षमता जरी वेगळी असली तरी एखादा वाईट विचार आपल्या आयुष्यावरच घात करेल एवढी विचारशक्ती कमजोर नसावी. एकदा अपयश आलं की त्यात अडकून न राहता पुढे नवीन काहीतरी करण्याची इच्छाशक्ती मनात निर्माण झाली की आपोआप यशाच्या हजारो वाटा स्पष्ट दिसू लागतात एवढं नक्की; पण आयुष्यातील बिकट आणि कमजोर प्रसंगांना टाळण्याचा आत्महत्या हा पर्यायच नव्हे.

आताच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक चढ-उताराला सामोरं जायचं असेल तर ते पेलण्याची ताकद आपल्यात असावीच लागते. जीवनातील कटू सत्य मुलांनी स्वीकारायला हवं. परीक्षेत कमी गुण मिळणे, प्रेमभंग, एकतर्फी प्रेम, घरच्यांसोबत भांडण, घरातील अंतर्गत वाद अशा अनेक कारणांनी तरुणांचं खच्चीकरण होत असतं. या गोष्टींना सामोरं जाण्याची तयारी आपल्यात असावी

Similar questions