Political Science, asked by khade3580, 1 day ago

apps. Update now प्रश्न क्र.१ अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (०३) सार्क ची स्थापना 1985 या वर्षी झाली. (नवी दिल्ली, ढाका, भूतान, इस्लामाबाद ) 1) जागतिकीकरण हा शब्दप्रयोग -----या दशकात झाला. (९२०, , (१९८०, ११९०, २०००, २०१०) iii) २०११ च्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरता ८२.१४टक्के आहे तर महिला साक्षरता -----एवढी आहे. (६५.४६%, ७५.४६%, ८५.४६%, ७४.४६%) icot​

Answers

Answered by 130096
0

Answer:

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया. ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते. विश्व बॅंकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजेअ- १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे. २) आयात शुल्काचा दर कमी करणे. ३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.[१]भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बॅंक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" म्हटले गेले व त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते. संजय भास्कर जोशी यांच्या मते, मुख्यत: व्यापारासाठी विविध देशांनी एकमेकांना जोडून घेत एकमेकांच्या भूमीत खुलेपणाने व्यापार करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. मो. वि. 

Similar questions
Math, 8 months ago