अर्थव्यवस्थेची सुरूवात घरापासुन
होते?
Answers
Answered by
7
अमर्याद गरजा व मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाचे साधने यांचा मेळ घालणार्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय.कुटुंबाच्या गरजा अमर्याद असतात आणि त्यांची पूर्तता करण्याची साधने मर्यादित असतात. उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसवण्याच्या प्रयत्नास कौटुंबिक व्यवस्थापन असे म्हणतात.व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न व खर्च म्हणजेच आर्थिक घटकांशी संबंधित असते. म्हणूनच कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यात बरेच साम्य आहे.यातूनच अर्थशास्त्राचा जन्म झाला. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते तसेच गावांचे/ शहरांचे, राज्यांचे, देशांचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन असते. म्हणूनच अर्थव्यवस्थेची सुरूवात घरापासुन होते.
Similar questions