Social Sciences, asked by pranita22kar, 10 months ago

अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरला आहे​

Answers

Answered by vithesh3399
13

Answer:

अरवली पर्वतहा दिल्लीपासून गुजरातेपर्यंत ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने जाणाऱ्‍या रांगांचा बनलेला आहे. लांबी सु. ६०० किमी. सर्वांत उंच शिखर, गुरुशिखर, (उंची १,७२२ मी.) अबूच्या पहाडात आहे. हिमालय व निलगिरी यांच्या मधल्या प्रदेशातील ते सर्वांत उंच शिखर आहे. अरवलीची उंची सामान्यतः ७६० ते १,०६० मी. इतकी भरते; पण जोधपूर व जयपूर यांच्यामधल्या रांगांची उंची ४५७ मी. पेक्षा कमी आहे. अरवलीचा अजमीरपासून अबूच्या पहाडापर्यंतचा भाग सर्वांत जाड व रुंद असून त्या भागातल्या रांगा ठळक व सलग आहेत. अरवलीच्या पश्चिमेस थरचे वाळवंट आहे व नैर्ऋत्य वाऱ्‍यांबरोबर जाणारी त्याची वाळू साचून अजमीरच्या ईशान्येस असलेल्या रांगांचा पुष्कळसा भाग झाकला गेला आहे. रांगांचे सखल भाग वाळूखाली पुरले गेले असून त्यांचे उंच भाग तेवढे उघडे राहिले आहेत. त्यांच्याही पलीकडे अधिक पुढे नैर्ऋत्येकडे गेलेल्या रांगा सिंधु-गंगा यांच्या जलोढ गाळांनी तशाच झाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे या वाळवंटी वाळूने किंवा जलोढाने झाकल्या गेलेल्या भागात सलग रांगा न दिसता वाळूच्या बाहेर डोकावणाऱ्‍या तुटकतुटक रांगा किंवा त्यांची उंच शिखरे मात्र दिसतात. दिल्लीजवळ रिज नावाने प्रख्यात असलेल्या भागात क्वॉर्ट्‌झाइट खडकाचे जे लहान व तुटक वरंबे दिसतात ते अरवलीच्या ईशान्य टोकाचे आहेत. अबूच्या नैर्ऋत्येस असलेल्या भागांकडे जाऊ लागले म्हणजे तेथल्या रांगा अधिक लहान व विरळ होत गेलेल्या आढळतात. अखेरीस सिरोहीच्या नैर्ऋत्य भागात त्यांचा शेवट होतो. आजच्या अरवलीचे उत्तरेकडील टोक दिल्लीजवळ व दक्षिणेकडील टोक गुजरातेत आहे. पण पूर्वी तो ईशान्य व नै‍‌र्ऋ‍त्य अशा दोन्ही दिशांस, बराच दूरवर, उत्तर प्रदेशातल्या हिमालयातील गढवालापर्यंत पसरला असावा असे दिसते. अरवलीच्या रांगांचे, लहानसहान उंचवट्यांच्या स्वरुपात असणारे, काही अवशिष्ट भाग सौराष्ट्रात (काठेवाडात) व कच्छात आढळतात. त्यावरुन अरवलीच्या रांगा तेथपर्यंत गेल्या असल्याच पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्याच्याही पुढे त्या गेल्या असाव्यात. या दक्षिणेकडील विस्ताराला फाटे फुटले असावेत व त्यांपैकी एक फाटा लक्षद्वीप बेटात व दुसरा पूर्वेस वळून कर्नाटकात व आंध्रात गेला असावा, असे अनुमान केले गेले आहे.

Hope it helps you

Mark me as brainlist

Answered by anushkasinha961
2

Answer:

hii..

how are you??

here is your answer..

अरावली भारत कऽ पश्चिमी भाग राजस्थान मे स्थित एक पर्वतमाला छी। भारत क भौगोलिक संरचना मे अरावली प्राचीनतम पर्वत छी। ई संसार कऽ सबसँ प्राचीन पर्वत श्रृंखला छी जे राजस्थान कऽ उत्तरसँ दक्षिण दुई भामे बाटल अछि। अरावली कऽ सर्वोच्च पर्वत शिखर सिरोही जिले मे गुरुशिखर (१७२२ /१७२७ मी.) अछि, जे माउन्ट आबू मे अछि।

अरावली पर्वत श्रंखला कऽ कुल लम्बाई गुजरात सँ दिल्ली तक ६९२ किलीमीटर अछि, अरावली पर्वत श्रंखला लगभग ८० % विस्तार राजस्थान मे अछि, दिल्ली मे स्थित राष्ट्रपति भवन रायशेला पहाड पर बनल अछि जे अरावली के भाग अछि, अरावली औसत ऊंचाई ९३० मीटर अछि तथा अरावली दक्षिणक ऊचाईसँ चौड़ाई सर्वाधिक अछि, अरावली या अर्वली उत्तर भारतीय पर्वतमाला छी।

अरावली कऽ अन्य उच्च चोटिसभ:-

  • गुरु शिखर - सिरोही
  • सेर - सिरोही
  • दिलवाडा - सिरोही(ई पर्वत पर प्रसिद्ध जैन मंदिर स्थित अछि)
  • जरगा - उदयपुर
  • अचलगढ - सिरोही
  • रघुनाथगढ(१०५५ मी) - सीकर
  • खो - अलवर
  • तारागढ - अजमेर
  • भेराच - अलवर

i hope it will help u..

bye bye ...

good night..

be happy

Similar questions