India Languages, asked by asmi1524, 1 year ago

arogyaman dhansmpadi ya uktitil vicharacha vistar kra

Answers

Answered by aman3495
8
आरोग्यम् धनसंपदा’, ‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले बोधवाक्य आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी पुंजी असते. सोने, चांदी, संपत्ती म्हणजे श्रीमंती नव्हे! पैसे मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या मिळकतीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे डॉक्टरकडे जातील, शारीरिक हानी होईल ती वेगळीच.

शरीर आणि मन यांचं आरोग्य एकमेकांशी निगडित असतं. थोडीशी पाठ, कंबर, डोकेदुखी याकडे दुर्लक्ष केलं तर नकळत चिडचिड वाढते, म्हणून दोघांकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. अतिथंड देशात सूर्यकिरणं अंगावर न पडल्यामुळे जीवनसत्व डीची कमतरता तेथील लोकांमध्ये असते. सकाळी नऊच्या आत अंगावर सूर्यकिरणं पडावीत म्हणतात, पण तेव्हा ऊन नसते, मग हे लोक दुपारचे ऊन अंगावर घेतात.

शर्मिलाला फार अ‍ॅलर्जीज होत्या. अर्थात त्या एका दिवसात आलेल्या नव्हत्या. प्रदूषण हा एक घटक असला तरी सबंध दिवस ए.सी. लावलेल्या खोलीत बसून काम करणं, शारीरिक व्यायाम नाही, कामाचा ताण, समाजात कमी वावरणं अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. घरी गेल्यावर घरच्यांबरोबर हास्यविनोद करा. मनाचं आरोग्य बिघडलं तर शरीराचं बिघडतं. त्याचे परिणाम कधी लवकर दिसतात तर कधी उशिरापण दिसतात हे नक्की. आयुष्यातील आव्हानं सहज पेलण्याकरिता, मानसिक, सामाजिक आरोग्य उत्तम राखण्याकरिता वेळ काढून शारीरिक व्यायाम, मन प्रसन्न राहण्याकरिता छंद जोपासा. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींशी संवाद ठेवा, असे उपाय सांगितले. शर्मिलाला ते पटलं. आचरणात आणणं अवघड असलं तरी अशक्य नाही हेही तिला माहीत होतंच. जवळच राहणाऱ्या मानसीला तिने, ‘मला मदत कर’ असं सांगितलं. तिलाही थोडे प्रश्न होते. दोघी पार्कमध्ये बसवलेल्या व्यायाम साधनांवर व्यायाम करू लागल्या. मुद्दाम काही वाचून त्यावर आठवडय़ातून एकदा तरी चर्चा करू लागल्या. एखाद्या वेळी बहीण-भावंडांना घेऊन आऊटिंग होऊ लागलं. नकळत दोघींचं मन प्रसन्न राहू लागलं. हळूहळू अ‍ॅलर्जीज कमी झाल्या. पचनशक्ती, प्रतिकारशक्ती वाढल्या. आयुष्य आनंदी झालं. आपण एखादं महागडं वाहन विकत घेतो तेव्हा त्याचं सव्‍‌र्हिसिंग, देखभाल अगदी डोळ्यात तेल घालून करतो, तशी या टॅक्स-फ्री संपत्तीची हल्ली केली जाते.


I hope it is helped you

aman3495: follow me
Answered by gautampulakala93
1

Answer:

here is your answer

Explanation:

सध्याचे जीवन हे धकाधकीचे झालेले आहे. यात जो वेळेचे गणित योग्यरितीने सोडवतो तोच पुढे जातो. पण यात हल्ली मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे. ‘सिर सलामत तो पगडी पचास’, असे म्हटले जाते. त्यामुळेच की काय आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन या दिनानिमित्ताने ‘विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबई’ यांच्याकडून प्राप्त झालेला लेख वाचकांसाठी देत आहोत.

महाराष्ट्र शासन सामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी नेहमीच जागरुक असते. शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ अशी आरोग्याची नवीन व्याख्या करावी लागेल. आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक असणे प्रत्येकालाच आवश्यक आहे. यासाठी आरोग्य जागृती महत्त्वाची आहे.

७ एप्रिल हा जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस आहे. जगात उद्भवणा-या विविध प्रकारच्या आरोग्यविषयक समस्याविषयी जागतिक पातळीवर जनजागरण करण्यासाठी दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडील आकडेवारी नुसार २०१० सालापर्यंत जगातील विविध रोगांच्या प्रादुभार्वापैकी ७० टक्के रोग हे असांसर्गिक असतील.

सध्या यांत्रिकी उपकरणामुळे शारिरीक कष्ट कमी होत चालले आहेत. कपडे धुणे, भांडी घासणे, पिठ मळणे, दळणे, कुटणे ही कामे यंत्रच करीत आहेत. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवत आहे. त्यातून अनेक रोगांना निमंत्रण मिळत आहे. विज्ञानाने भौतिक सुख माणसाला दिले आहे. पण त्यामुळे काही अंशी शारिरीक आणि मानसिक स्वास्थ हरविले आहे. प्रदूषण ही एक मोठी समस्या आहे. शासन त्यावर उपाय योजित असते. मोठय़ा प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे कार्बन वायू शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगसारखी समस्या निर्माण झाली आहे. शासन पातळीवर अनेक निर्णय घेऊन नवीन योजना आणल्या जात आहेत.

कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यात प्रत्येकी १ जिल्हा रुग्णालय असून ग्रामीण रुग्णालय ठाणे-१५, रायगड ९, रत्नागिरी ८ व पालघर जिल्ह्यात १० आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे ठाणे ७८, रायगड ५२, रत्नागिरी ६७ व पालघर ४८ आहेत. राज्यात बालआरोग्य अभियानांतर्गत विविध शिबीर आयोजीत करण्यात आली. त्या माध्यमातून बालकांचे आरोग्य सुधारणे, गरजू बालकांना लसीकरण करणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्यात ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१६ या काळात महाअवयवदान मोहीम घेण्यात आली. राज्यभर या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरक्षित मातृत्वासाठी जननी सुरक्षा कार्यक्रम व जननी शिशू सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे.

आरोग्य चांगले रहावे असे वाटत असेल तर हवा शुद्ध असली पाहिजे. हवा शुद्ध राखण्यासाठी आपल्या परिसरात स्वच्छता राखली पाहिजे. झाडे लावली पाहिजेत. धूर, केरकचरा, गटारे यांच्यामुळे आरोग्य धोक्यात येते, म्हणून परिसर हा स्वच्छ राखला पाहिजे. रस्त्यात कोठेही थुंकणे, नाक साफ करणे, धूम्रपान करणे इत्यादी सवयी टाळल्या पाहिजेत. शासनाने २ कोटी वृक्ष लागवड करून पर्यावरण अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला.

संतुलित आहार-आपला आहार संतुलित असला पाहिजे. तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, खाण्यात डाळी,फळे, दूध, पालेभाज्या, सॅलड्स इत्यादींचा समावेश हवा. सात्त्विक आहार असेल तर आपले शरीर निरोगी राहते. योग्य व्यायाम-दररोज काही ठराविक वेळेत व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. रक्ताभिसरण चांगले होते. शरीर बळकट झाल्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते. आपोआपच रोगजंतूंशी रक्तपेशी लढू शकतात. उत्साह वाढतो व कोणतेही काम आपण सहजपणे करू शकतो. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. पुरेशी विश्रांती- ठरावीक वेळ काम केल्यानंतर पुरेशी विश्रांती आवश्यक असते. पुरेशी विश्रांती न मिळाल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. कोणतेही काम कुशलतेने व नीटनेटके करायचे असेल, तर पुरेशी विश्रांती घेतलीच पाहिजे.

शुद्ध पाणी-पिण्याचे पाणी शुद्ध असले पाहिजे. ते गाळून, उकळून निर्जंतूक करून घेतलेले असले पाहिजे, अन्यथा पाण्यावाटे काही रोगांचे जंतू पोटात प्रवेश करतात. त्यातूनच रोगांचा प्रादुर्भाव होतो. या सर्व आरोग्याबाबतच्या प्राथमिक गोष्टी झाल्या. या सर्व गोष्टींबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक संतुलन-प्रत्येक व्यक्तीने दुस-या व्यक्तीशी प्रेमाने, आपुलकीने वागले पाहिजे. स्वार्थीपणा दूर ठेवला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता एकमेकांशी बंधुभावाने वागले पाहिजे, म्हणजे मानसिक आरोग्य चांगले राहील. त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होऊन सर्वांस सुख लाभेल. साधारणत: आरोग्याबाबत प्रत्येक व्यक्तीने जागरुक राहिले पाहिजे. व्यक्तिगत स्वच्छतेबरोबर परिसराची स्वच्छता राखण्यासाठीही प्रत्येकाने जागरुक असले पाहिजे. जागतिक पातळीवर ही जागरुकता हवी. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सध्या व्यायाम, योगासने करण्याकडे लोक टाळाटाळ करतात. मग वेळ मिळत नाही हे कारण सर्वांच्या तोंडून ऐकायला मिळते.

आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणजेच स्वत:साठी थोडासा वेळ काढला पाहिजे. आपण सर्वांनी संकल्प करू या तो नुसता संकल्प न ठेवता प्रत्यक्षात अंमलात आणू या. आरोग्य हे धन आहे आणि प्रत्येकाने शारिरीक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Similar questions