असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि ल ग बाई या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा,
Answers
Explanation:
माहेरची माहेरवाशीण ही माहेरला जाण्यास उत्सुक असते, तिला फार छान वाटते, भाऊ राया तिला घेऊन तिला दारी रथ आणतो, कल्पना माहेरवाशिणी या कवितेत केली आहे.
Answer:
कवी सदाशिव माली यांच्या माहेर या कवितेतील दिलेल्या ओळी आहेत.
माहेरची माणसे सोडून जेव्हा एखादी स्त्री सासरला जाते त्यावेळेस सासरला आपला संसार करत असताना तिला अनेक गोष्टी बघितल्यानंतर आपल्या माहेरच्या माणसांची आठवण येते. स्त्रीच्या मनात असलेल्या माहेर बद्दलची उत्कटता कवीने आपल्या शब्दात अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेले आहे.
वरील ओळींच्या माध्यमातून कवी सांगतात की स्त्रीला आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तू बघून आपल्या माहेरच्या माणसांची आठवण होते. ती ज्या वेळेस तापी काठची चिकन माती बघते त्या मातीपासून तिला काहीतरी बनवावेसे वाटते. गहू दळत असताना त्या गव्हापासून लाडू बनवावेसे वाटतात आणि हे लाडू शेल्यात बांधावेसे वाटतात.
लाडू बांधून झाल्यावर तिला आपल्या भावाची आठवण येते व ती म्हणते की माझा भाऊ माझ्यासाठी रथच घेऊन येईल व त्या रथाला नंदी जुंपलेला असेल आणि मी आनंदाने त्या रथात बसून माझ्या माहेरी जाईल अशी भावना ती स्त्री व्यक्त करते.
आपल्या भावाच्या मनात आपल्याबद्दल किती प्रेम आहे व तो आपल्यासाठी काय करू शकतो अशा स्त्रीच्या मनातील भावना कवी आपल्या शब्दातून व्यक्त करतात.