India Languages, asked by abhijeetarote1999, 10 months ago

अस कोणतं फुल आहे की ना रंग व ना सुगंध?​

Answers

Answered by Anonymous
17

Answer:

केशरला इंग्रजी मध्ये saffron असे म्हणतात.केशर हे गवत वर्गीय पिक असून या पिकास समुद्रसपाटी पासून २००० ते २५०० मीटर उंचीचा थंड बर्फाळ हवामानाचा प्रदेश आवश्यक असून पाण्याचा निचरा होणारी जमीन फ्वी असते.

केशर हे मनास व बुद्धीस उत्तेजन आणणारे असून केशरमुळे मनोविकार, ताणतणाव कमी होऊन मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवते. गरोदर महिलांच्या पोटातील बाळाच्या वाढीसाठीही केशर उपयोगी आहे. तसेच स्तनदा मातेचे दुधही केशरमुळे वाढण्यास मदत होते. केशर मुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. केशर हे वात क्षामक असून केशर हे प्रकृतीने उष्ण असल्याने दुधाबरोबर केशर घेतांनी दोन ते तीन काड्या घेतल्या तरी पुरेशा ठरतात. आयुर्वेदानुसार केशरचे रोज सेवन करावे.

आपण ज्यास केशर बोलतो ते फुलांचे पुंकेसर असते. अशा ओरीजनल केशरचा विक्रीभाव हा प्रतीग्राम ३०० ते ३५० रुपये असतो. बाजारामध्ये हिमालयीन केशर, अमेरिकन केशर, अफगाण केशर, चायना केशर सारख्या जातीचे केशर असून हिमालयीन केशर हे सर्वोत्तम केशर असून चायना केशर हे सर्वात हलके प्रतीचे केशर असून चायना केशर प्रतीग्राम २०० ते २५० रुपये प्रती ग्राम असतो. या व्यतिरिक्त बाजारात स्वस्त दरात उपलब्ध असणारे केशर हे भेसळ युक्त असते.

अशा विविधतेमुळे आपणास ओरीजनल केशर ओळखू येत नाही आणि केशर खरेदी करतांनी आपली फसवणूक होऊ शकते. काही घरगुती टेस्टद्वारे आपण ओरीजनल व भेसळ विरहीत केशर कोणते ते ओळखू शकतो.

*रंग- गर्द केशरी *वास - काहीसा सुगंधी पण विशीष्ट असा छान वास असतो. *आकार - २ ते २.५ cm लांब, टोकास गोलाकार निमुळते असते तर बुडाकडे जरासे चपटे व शेंड्याकडे मोठे असते. *चव - थोडीसी कडवट असते. *तेलकटपणा- पूर्ण ड्राय न झालेले केशर कागदावर टाकल्यानंतर त्याचा थोडासा तेलकटपणा कागदाला लागतो. *दुधातील टेस्ट - दुधात टाकल्यावर केशर पिवळसर रंग सोडतो व केशर त्यात विरघळत नाही व ते लवचिक बनते.

असेच उत्तम व भेसळ विरहीत दर्जेदार हिमालयीन केशर प्रेफिक्स सारख्या काही नामांकित कंपन्यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहे.

डॉ. सुजाता पटवर्धन

Answered by mahesh4855
0

Answer:

thank you for your question

Similar questions