(४) अस्थिभंग कशाला म्हणतात?
उत्तर:
Answers
Answer:
अभिघात (आकस्मिक इजा) किंवा ताण पडल्यामुळे हाड पूर्ण अथवा अंशत: मोडल्यास त्या अवस्थेला ‘अस्थिभंग’ असे म्हणतात. अभिघाताची वा ताणाची शक्ती व स्वरूप आणि अस्थींची ताण सोसण्याची क्षमता यांवर अस्थिभंग अवलंबून असल्यामुळे काही अस्थींमध्ये भंग होण्याची विशेष प्रवृत्ती आढळते.
लहान मुलांच्या अस्थी पुरेशा कठीण आणि भक्कम झालेल्या नसल्यामुळे मूल चालता चालता पडले तरी अस्थिभंग होण्याचा संभव असतो. वृद्धावस्थेत अस्थी ठिसूळ झालेल्या असल्यामुळे अल्प शक्तीच्या अभिघातामुळेही अस्थिभंग होऊ शकतो. सतरंजीच्या दशांमध्ये पाऊल अडकून पडण्याचे निमित्त होऊनही वृद्धावस्थेत मांडीच्या हाडाची ग्रीवा (मानेसारखा भाग) मोडल्याची उदाहरणे आढळतात. तरुण आणि प्रौढ स्त्रीपुरुषांची हाडे उच्चतम क्षमतेच्या अवस्थेत असल्यामुळे शारीरिक ताण पडणारी कार्ये करावी लागत असूनही अस्थिभंग होत नाही. अभिघात वा ताण तीव्र अथवा वेडावाकडा असेल तरच अस्थिभंग होऊ शकतो.
अस्थिनिर्मितीतील जन्मजात दोष, अस्थींचे काठिण्य कमी करणारे ⇨मुडदूस, ⇨ अस्थिमार्दव वगैरे रोग, अस्थींची अर्बुदे (सूक्ष्म घटकांच्या म्हणजे कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या निरुपयोगी गाठी ) आणि कर्करोगाचे अस्थीतील प्रक्षेप (रोगाच्या मूलस्थानातून इतरत्र उत्पन्न झालेले कर्क) वगैरे कारणांमुळे अस्थिभंगाचा संभव अधिक दिसतो. काही मानसिक आणि तंत्रिकारोगांतही (मज्जातंतूंच्या रोगांत) अपघातांचा संभव अधिक असल्याने अस्थिभंगांचे प्रमाण वाढते.
कारणे : (१) प्रत्यक्ष अभिघात, (२) अप्रत्यक्ष अभिघात. उदा., उंचावरून पडताना आघात जरी तळपायावर झालेला असला तरी मांडीचे अथवा पायाचे हाड मोडते, (३) स्नायूंचे आकस्मिक आणि जोराने आकुंचन. गुडघ्याच्या वाटीचा अस्थिभंग या प्रकाराचा असतो.
प्रकार : अस्थिभंग पूर्ण अथवा अपूर्ण असू शकतो. पूर्ण प्रकारात अनुप्रस्थ (आडवा), तिरका, अनुदैर्घ्य (उभा) अथवा मळसूत्राकार असा अस्थिभंग होऊ शकतो. अपूर्ण प्रकारात अस्थीची एकच बाजू मोडलेली असून दुसरी शाबूत असते. उदा., डोक्याच्या कवटीच्या बाहेरचा थर मोडला तरी आतला थर अभंग असू शकतो. लहान मुलांची हाडे मऊ असल्यामुळे केव्हाकेव्हा अस्थिभंग हिरवी डहाळी मोडल्यासारखा असतो. अपूर्ण अस्थिभंगाची ही उदाहरणे होत.
चिकित्सेच्या दृष्टीने अस्थिभंगाचे पुढील प्रकार होतात : (१) सामान्य : या प्रकारात त्वचेवर जखम नसते. (२) सव्रण (जखमेसह) : त्वचेवर जखम असल्यामुळे अस्थिभंगस्थानी जंतुसंसर्ग होण्याचा संभव असतो. (३) अंतर्घट्टित : हाडाची मोडलेली टोके एकमेकांत घट्ट रुतून बसल्यासारखी असतात. (४) विखंडित : दोहोंपेक्षा जास्त तुकडे होणे. (५) उपद्रवयुक्त : तंत्रिका, रोहिणी, संधी वगैरे इतर अवयवांना इजा झालेली असणे. (६) अग्रप्रवर्ध विलग होणे : लांब अस्थींची वाढ होत असताना त्यांच्या टोकावर असलेले अग्रप्रवर्ध (ज्यामुळे अस्थीची वाढ होते असा
Answer:
Very common
More than 10 million cases per year (India)
Requires a medical diagnosis
Lab tests or imaging often required
Treatable by a medical professional
Short-term: resolves within days to weeks
Critical: needs emergency care